आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमान करणार डिजिटल डेब्यू:आता OTT प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार सलमान खान, अभिनेत्याने वेब सीरिजसाठी मागितले तब्बल 150 कोटी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या वर्षाच्या अखेरीस सुपरस्टारचा डिजिटल डेब्यू होऊ शकेल.

अभिनेता हृतिक रोशन, आणि अक्षय कुमारनंतर आता बॉलिवूडचा दबंग अर्थातच सुपरस्टार सलमान खानसुद्धा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सलमानला एका प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मने ऑफर दिली आहे, त्यासाठी सलमानच्या टीमने मानधन म्हणून तब्बल 150 कोटींची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यासाठी आपला होकारही दिला आहे.

सध्या दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू असून या महिन्याच्या अखेरीस हा करार अंतिम होण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की सलमानची ही वेब सीरिज चार सीझनमध्ये तयार होईल आणि या वर्षाच्या अखेरीस सुपरस्टारचा डिजिटल डेब्यू होऊ शकेल.

'राधे: योर मोस्ट वाँडेट भाई' या चित्रपटात दिसणार आहे सलमान
सलमान खान आगामी ‘राधे: योर मोस्ट वाँडेट भाई’ या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. चित्रपट प्रथम डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असल्याची चर्चा होती. त्यानंतर चित्रपट वितरकांनी सलमानला पत्र लिहून चित्रपट डिजिटलपणे प्रदर्शित न करण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीनंतर सलमानने त्याचा हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. ईदच्या मुहूर्तावर सलमानचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होतोय.

याशिवाय सलमान 'मुळशी पॅटर्न' या गाजलेल्या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या 'अंतिम' या चित्रपटातही झळकणार आहे. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. या महिन्यात सलमान या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करुन मार्च महिन्यापासून 'टायगर 3' च्या चित्रीकरणाला सुरुवात करेल. या चित्रपटात त्याच्यासह कतरिना कैफ झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...