आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वय हा केवळ आकडा आहे का?:27 वर्षांनी लहान दिशा पाटनीसोबत रोमान्स करणारा एकमेव अभिनेता नाहीये सलमान, बॉलिवूडमध्ये 50+ हीरोसोबत कमी वयाच्या अभिनेत्री दिसणे अगदी सामान्य बाब

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देव आनंद, विनोद खन्ना, रजनीकांत, अमिताभ बच्चन आणि संजय दत्त यांनीही त्यांच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रींसोबत केला आहे रोमान्स

सलमान खानचा 'राधे' हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला आहे. हा सिनेमा पायरसीचा बळी पडला आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा यावरही बरीच टीका होत आहे. या सर्वांमध्ये सोशल मीडियावर आणखी एक चर्चा रंगू लागली आहे, आणि ती म्हणजे चित्रपटाचा नायक सलमान आणि नायिका दिशा पाटणी यांच्या वयातील अंतर.

सलमानने त्याच्यापेक्षा 27 वर्षांनी लहान असलेल्या नायिकेबरोबर स्क्रीन शेअर केल्याने त्याच्यावर टीका देखील होत आहेत, पण हे चित्र नवीन नाही. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या अभिनेत्याने त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रीसोबत पडद्यावर रोमान्स करणे ही बॉलिवूडसाठी नवीन गोष्ट नाही. वयाची चाळिशी ओलांडलेल्या अनेक अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दुरावल्या, पण पन्नाशी ओलांडलेले हीरो मात्र बॉलिवूडमध्ये सदाबहार मानले जातात.

सलमानचा पहिला चित्रपट बीवी हो तो ऐसी हा 1988 मध्ये रिलीज झाला होता. 1989 मध्ये रिलीज झालेल्या 'मैने प्यार किया' या चित्रपटातून तो पहिल्यांदा हीरो म्हणून नावारुपास आला. तेव्हापासून आजतागायत त्याची लोकप्रियता कायम आहे. पण दुसरीकडे सलमानबरोबर काम केलेल्या बहुतेक अभिनेत्रींनी बॉलिवूडला रामराम ठोकला आहे. किंवा आईच्या भूमिकांमध्ये त्या दिसत आहेत. पण 55 वर्षीय सलमान अद्याप मुख्य भूमिकेत झळकतोय.

सलमानच्या पहिल्या 5 अभिनेत्री आता काय करत आहेत

  • सलमानची मैनें प्यार किया या चित्रपटातील हीरोइन भाग्यश्री आज 52 वर्षांची आहे. तिचा मुलगा अभिमन्यूचा आगामी निकम्मा या चित्रपटाचे प्रमोशन स्वतः सलमान खानने बिग बॉसमध्ये केले होते. भाग्यश्री स्वत: 'थलायवी' चित्रपटात कंगना रनोटच्या आईची भूमिका साकारत आहे. पण सोबतच भाग्यश्री तिच्या फिटनेस व्हिडिओ आणि टिप्ससाठी जास्त ओळखली जाते. तिचे वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय आहेत.
  • 1990 मध्ये सलमानचा बागी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याची नायिका नगमा आता पूर्णवेळ राजकारणात सक्रिय आहे. ती कॉंग्रेसची स्टार प्रचारक मानली जाते.
  • सलमानचा तिसरा चित्रपट 'सनम बेवफा'ची नायिका चांदनी होती. ती विवाहित असून अमेरिकेत स्थायिक झाली आहे. ती तिथे डान्स स्कूलही चालवते.
  • सलमानची चौथी नायिका आहे रवीना टंडन. 'पत्थर के फूल' या चित्रपटात दोघे एकत्र झळकले होते. रवीनाचे चित्रपट वितरक अनिल थडानी यांच्याशी लग्न झाले आहे. प्राण्यांच्या संरक्षणावरही ती खूप काम करत आहे. कोरोना संकटात, तिने लोकांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी बरेच काम केले आहे.
  • आयशा जुल्का सलमानची पाचवी नायिका असून त्याच्यासोबत 'कुर्बान'मध्ये दिसली होती. कन्स्ट्रक्शन टायकून समीर वाशीशी लग्न केल्यानंतर आयशा स्पा आणि रिसॉर्टचा व्यवसाय करते.

दिशा पाटनीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा सलमानचे आठ चित्रपट आले होते

सलमान आणि दिशाचा हा पहिला चित्रपट नाहीये. यापूर्वी दिशा सलमानसोबत ‘भारत’मध्ये दिसली होती. दिशा पाटनीचा जेव्हा जन्म झाला तेव्हा 27 वर्षीय सलमानने आठ चित्रपट प्रदर्शित झाले होते. 13 जून 1992 रोजी दिशाचा जन्म झाला. त्यानंतर काही दिवसांनी सलमानचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात सलमानची नायिका शीबा होती. जी आता 51 वर्षांची आहे आणि तिने बरेच आधी चित्रपटात काम करणे सोडून दिले आहे. 1987 मध्ये जेव्हा सलमान 'मैंने प्यार किया' ची तयारी करत होता तेव्हा सोनाक्षी सिन्हाचा जन्म झाला होता. 2010 मध्ये दबंग या चित्रपटात सोनाक्षीसोबत सलमानची जोडी जमली होती तेव्हा दोघांमधील वयाचे अंतर 22 वर्षांचे होते.

सलमानने यापूर्वी त्याच्यापेक्षा 20-20 वर्षांनी लहान जॅकलिन आणि सोनमसोबत काम केले आहे. 2005 मध्ये आलेल्या सलमानच्या 'लकी नो टाइम टू लव्ह' चित्रपटातील सलमानची हीरोइन स्नेहा उल्लाल तेव्हा अवघ्या 18 वर्षांची होती, तर सलमान 40 वर्षांचा होता. सलमान आणि अनुष्काचा चित्रपट 'सुल्तान' 2016 मध्ये आला होता, तेव्हा सलमान 51 वर्षांचा होता, पण अनुष्का 28 वर्षांची होती.

30 वर्षांनी लहान तरुणीसोबत रोमान्स करणार खिलाडी
स्वतःपेक्षा लहान वयाच्या अभिनेत्रींसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्यास अक्षय कुमारही मागे नाही. 'लक्ष्मी' या चित्रपटात तो त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान कियारा अडवाणीसोबत दिसला होता. 'हाऊसफुल 4' तो त्याच्यापेक्षा वयाने 23 वर्षांनी लहान असलेल्या क्रिती सेनॉनसोबत दिसला होता. यापूर्वी 2015 मध्ये सिंग इज ब्लिंग या चित्रपचात तो 23 वर्षांनी लहान अ‍ॅमी जॅक्सनसोबत झळकला होता. टॉयलेट-एक प्रेम कथा या चित्रपटाची नायिका भूमी पेडणेकरापेक्षा अक्षय 22 वर्षांनी मोठा आहे.

आगामी चित्रपटांविषयी बोलायचे म्हणजे अक्षय त्याच्यापेक्षा वयाे 21 वर्षांनी लहान असलेल्या वाणीसह 'बेल बॉटम' मध्ये दिसणार आहे. पृथ्वीराज या चित्रपटामध्ये अक्षय मानुषी छिल्लरसोबत काम करतोय, जी त्याच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान आहे.

अतरंगी रेमध्ये 28 वर्षांनी लहान सारासोबत काम करतोय अक्षय
अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांनी 'मैं खिलाडी तू अनाडी' आणि 'ये दिल्लगी' सारख्या चित्रपटातले एकत्र काम केले होते. आता अक्षय सैफची मुलगी सारा अली खान सोबत 'अतरंगी रे'मध्ये काम करणार आहे. अक्षयपेक्षा सारा 28 वर्षांनी लहान आहे. पण चित्रपटात ते हीरो-हीरोईन म्हणून झळकणार की त्यांच्यात दुसरे काही नाते दाखवले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

शाहरुख आणि अनुष्का यांच्यात 23 वर्षांचे अंतर
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण पहिल्यांदा 'ओम शांती ओम' चित्रपटात पडद्यावर एकत्र दिसले. या दोघांमध्ये वयातील अंतर 21 वर्षे आहे. शाहरुख आणि अनुष्का शर्मादेखील मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले आहेत. या दोघांत 23 वर्षांचे अंतर आहे. आमिर खानने 'गजनी'मध्ये त्याच्यापेक्षा 20 वर्षांनीलहान असीनबरोबर काम केले. शिवाय, अजय देवगणची नायिका एरिका त्याच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान होती.

देव आनंद आणि अमिताभही तरुण नायिकांसोबत रोमान्स करण्यात नव्हते मागे
देव आनंद यांनी टीना मुनिमबरोबर नायक म्हणून काम करुन खळबळ उडवून दिली होती. अमिताभ यांनी त्यांच्यापेक्षा 28 वर्षांनी लहान मनीषा कोईरालासोबत 'लाल बादशहा'मध्ये जे ठुमके लावले होते, ते बघण्यासारखे होते.

माधुरी आणि डिंपल यांनी पिता-पुत्रासोबत केले एकत्र काम
माधुरी दीक्षित आणि डिंपल कपाडिया यांनी तर पिता-पुत्राच्या जोडीसोबत पडद्यावर रोमान्स केला आहे. माधुरीने 'दयावान' मध्ये विनोद खन्ना यांच्यासोबत आणि 'मोहब्बत'मध्ये त्यांचा मुलगा अक्षय खन्नासोबत स्क्रीन स्पेस शेअर केली होती. माधुरी आणि विनोद खन्ना यांच्यात 21 वर्षांचे अंतर होते. तर माधुरी अक्षय खन्नापेक्षा आठ वर्षांनी मोठी होती. डिंपल कपाडियानेदेखील वडील धर्मेंद्र आणि मुलगा सनी देओलसोबत एकत्र काम केले आहे. डिंपल ही विनोद खन्ना यांचीही नायिका होती आणि 'दिल चाहता है' चित्रपटात अक्षय खन्ना डिंपलकडे आकर्षित होते, असे दाखवले गेले होते.

हे आपले सुपरहीरो आहेत, त्यांच्यावर वयाचे बंधन लागू होत नाही
पद्मावत, रामलीला, बाजीराव मस्तानी, की अँड का, मेरी कोम यांसह अनेक चित्रपटांची कास्टिंग डायरेक्टर असलेल्या श्रुती महाजनने भास्करला सांगितले की, एक पैलू म्हणजे सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान आपले सुपरहिरो आहेत. सुपरहीरो हे टाइमलेस किंवा एजलेस असतात. वयाची मर्यादा इतरांवर लागू होते, या सुपरहीरोंवर नाही.

श्रुती सांगते की, त्यासोबतच आणखी एक पैलू म्हणजे ट्रेंड बदलत आहे. आपण जागतिक सिनेमाचे अनुकरण करतो. आता ओटीटीमध्ये बरीच वास्तववादी कामे सुरू आहेत. कास्टिंग डायरेक्टर म्हणून ओटीटी प्रोजेक्टसाठी जे प्रश्न उपस्थित होतात, त्यामध्ये आता या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते.

बातम्या आणखी आहेत...