आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तेरे बिना साँग:सलमान-जॅकलिनने फार्महाऊसमध्ये स्वतः शूट केले एक रोमँटिक गाणे, सांगितले टीमशिवाय फक्त तिघांनी कसे केले काम  

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या गाण्याचे टीझर लवकरच रिलीज होईल.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अभिनेता सलमान खान त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसवर आहे. येथे त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त अभिनेत्री  जॅकलिन फर्नांडिसही आहे. अलीकडेच या दोघांनी चाहत्यांना एक चांगली बातमी दिली आहे. ती म्हणजे हे दोघे लवकरच तेरे बिना हे एक रोमँटिक गाणे घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊनचे पालन करत केवळ तिघांनी मिळून हे गाणे तयार केले आहे. 

अलीकडेच सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जॅकलिनसोबतचा त्याचा मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी सांगितले आहे की प्रॉडक्शन टीमशिवाय हे गाणे कसे शूट केले गेले आहे. सलमान म्हणाला, 'माझ्या मनात एक गाणे होते, ते याकाळातच प्रदर्शित करावे, असे माझ्यात मनात आले. मी आतापर्यंत चार गाणी गायली आहेत पण मला वाटते की हे गाणे सर्वोत्कृष्ट झाले आहे.'

View this post on Instagram

@jacquelinef143 @waluschaa

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on May 8, 2020 at 12:08pm PDT

'तेरे बीना' गाण्याच्या शूटिंगमधील अडचणींबद्दल बोलताना जॅकलिन म्हणाली, 'आम्हाला मोठ्या प्रॉडक्शनमध्ये शूटिंग करण्याची सवय आहे. आम्ही या गाण्याच्या तयारीसाठी एक आठवडा घालवला आणि नंतर आम्ही तीन लोकांच्या टीमने ते शूट केले. शूटिंग दरम्यान पहिल्यांदाच मी लाइटकडे लक्ष दिले, ते सेटकरत होतो. मी सामानसुद्धा जमवत होते.' याशिवाय स्वत: जॅकलिननेही तिच्या कपड्यांवर आणि मेकअपवर काम केले आहे.

अशी झाली गाण्याची शूटिंग

सलमानने सांगितले आहे की, फार्महाऊसमध्ये बरीच उष्णता आहे, ज्यामुळे चार दिवस संध्याकाळी फक्त 5 ते 6 या वेळेत ते शूट केले गेले आहे. सलमानला आपली प्रॉपर्टी जास्त दाखवायची नव्हती, म्हणून त्याने सर्व शूटिंग खूप सांभाळून केली आहे. याचे कारण सांगताना सलमान म्हणाला, 'हे माझे घर आहे'. त्याने पुढे सांगितले की, सर्व लोक फार्म हाऊसचा वाय-फाय वापरत आहेत, अशा वेळी व्हिडिओ एडिटरकडे पाठवायला खूप वेळ लागला. या गाण्याचे टीझर लवकरच रिलीज होईल.

बातम्या आणखी आहेत...