आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगर 3:सलमान-कतरिना रशियाला रवाना, पुढील 45 दिवसांत 5 युरोपियन देशांमध्ये शूट केले जातील चित्रपटातील 5 वेगवेगळे अ‍ॅक्शन सिक्वेन्स

अमित कर्ण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रशियामध्ये चित्रपटाचे दीर्घ शूटिंग शेड्यूल आहे

बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ त्यांच्या आगामी 'टायगर 3' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी 150 कास्ट आणि क्रूसह बुधवारी रशियाला रवाना झाले आहेत. तसेच, पुढील 45 दिवस ते 5 युरोपियन देशांमध्ये चित्रपटातील 5 वेगवेगळे अ‍ॅक्शन सिक्वेन्स चित्रीत करतील. चित्रपटाशी संबंधित ट्रेड सूत्रांनी याची पुष्टी केली आहे. आदित्य चोप्राने यासाठी एक जंबो विमान भाड्याने घेतले. बायोबबलची साखळी तुटू नये म्हणून सर्वजण एकत्र या विमानाने युरोपला रवाना झाले आहेत.

चित्रपटात शाहरुखचा कॅमिओ रोल
सूत्रांच्या माहितीनुसार, "टीम रशिया व्यतिरिक्त तुर्की आणि ऑस्ट्रियाला जाईल. याशिवाय, आणखी दोन युरोपियन देशांमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचे नियोजन आहे. सलमान, कतरिना, रणवीर शौरी, आशुतोष राणा यांच्यासह एकूण 150 क्रू मेंबर 45 दिवस पाच युरोपियन देशांमध्ये पाच वेगवेगळे अ‍ॅक्शन सिक्वेन्स चित्रीत करतील. या पार्टच्या कथेचे एक वेगळे मिशन आहे. एक प्रकारे, या वेळी कथेत भारताचा टायगर अर्थात सलमान आणि पाकिस्तानचा टायगर इम्रान हाश्मी यांच्या पात्रांमध्ये संघर्ष बघायला मिळेल. मागील दोन पार्टमध्ये टायगर, झोया आणि गोपी आर्य यांच्या पात्रातून कथा पुढे सरकली होती. पण यावेळी चित्रपटात शाहरुखचा कॅमिओ आहे. त्याने आधीच त्याच्या भागाचे चित्रीकरण केले आहे. त्यामुळे तो टीमसह युरोपला गेला नाही."

रशियामध्ये चित्रपटाचे दीर्घ शूटिंग शेड्यूल आहे
कतरिनाच्या निकटवर्तीयांनी सांगितले, "त्या पाच अ‍ॅक्शन सिक्वेन्ससाठी कतरिनाने 60 तर इम्रान हाश्मीने 45 आणि सलमान खानने 35 दिवसांचे ट्रेनिंग घेतले आहे. इम्रान हाश्मी गेल्या दोन वर्षांपासून त्याच्या बॉडीवर काम करत होता. भारतात सर्वांनी इनडोअर स्टुडिओमध्ये चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. पुढे , चित्रपटाचे चित्रीकरण पाच वेगवेगळ्या युरोपियन देशांमध्ये आउटडोअर लाईव्ह लोकेशन्सवर केले जाईल. रशियाचे सर्वात लांब शेड्यूल आहे. तेथे टीम 15 दिवस शूट करेल. इतर देशांमध्ये, सात ते दहा दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे."

'भाईजान' आणि 'ब्लॅक टायगर'मध्ये दिसणार आहे सलमान खान

निर्माते टायगर 3 चे चित्रीकरण यावर्षी नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्नात आहे. यानंतर सलमान खान सर्वप्रथम फरहाद सामजीच्या 'भाईजान' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. त्या चित्रपटाचे नाव पूर्वी 'कभी ईद, कभी दिवाली' असे होते. यात त्याच्यासह पूजा हेगडे झळकणार आहे. त्यानंतर सलमान खान 'ब्लॅक टायगर' चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. हा राजकुमार गुप्ता यांचा चित्रपट आहे. त्यानंतर, तो सूरज बडजात्या आणि साजिद नाडियाडवाला दिग्दर्शित चित्रपट देखील करेल.

बातम्या आणखी आहेत...