आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा परिणाम:कोविड 19 मुळे दुबईत होऊ शकणार नाही सलमान-कतरिनाच्या 'टायगर 3'चे चित्रीकरण, निर्मात्यांनी घेतला हा निर्णय

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • निर्मात्यांनी दुबईत चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि कतरिना कैफ लवकरच टायगर 3 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण इस्तंबूलमध्ये होण्याची शक्यता आहे. यापूर्वी या चित्रपटाचे शूटिंग दुबईमध्ये सुरू होणार होते, परंतू तिथे कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या योजनेत बदल करण्यात आला. त्यामुळे निर्मात्यांनी दुबईत चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सलमानने दिल्या तारखा

सलमानने दिग्दर्शक मनीष शर्मा आणि निर्माता आदित्य चोप्रा यांना मोठ्या प्रमाणात तारखा दिल्या आहेत आणि निर्माते सलमानच्या तारखा वाया जाऊ देऊ इच्छित नाहीत. त्यामुळे त्यांनी आता चित्रीकरणासाठी स्थान बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता दुबईऐवजी चित्रपटाचे चित्रीकरण इस्तंबुल येथे करण्याच्या निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

सलमानने अलीकडेच महेश मांजरेकर दिग्दर्शित अंतिम : द फायनल ट्रूथचे चित्रीकरण पूर्ण केले. त्यानंतर तो लवकरच शाहरुख खानसोबत पठाण या चित्रपटाचे शेड्युल पूर्ण करणार आहे. त्यानंतर तो टायगर 3 या चित्रपटाची तयारी सुरू करेल. चित्रपटात तो लीन अवतारमध्ये दिसणार आहे. या लूकसाठी सलमानने फिटनेस ट्रेनर नियुक्त केला आहे.

ईदला रिलीज होणार 'राधे'
सलमान 'अंतिम' आणि 'टायगर 3' या चित्रपटांपूर्वी 'राधे'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यावर्षी ईदला त्याचा हा चित्रपट रिलीज होणार आहे. सलमानच्या या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल 250 कोटींची ऑफर मिळाली होती. परंतु सलमानने ओटीटीला साफ नकार दिला आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटर मध्येच प्रदर्शित होईल, अशी भूमिका त्याने घेतली आहे. ‘राधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा यांनी केले असून, यामध्ये सलमान खानसह दिशा पाटनी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय जॅकी श्रॉफ, जरीना वहाब आणि रणदीप हुडा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यात आहेत. 'राधे' या चित्रपटाची निर्मिती सलमान खान, सोहेल खान आणि अतुल अग्निहोत्री यांचे बॅनर सलमान खान फिल्म्स, सोहेल खान प्रॉडक्शन्स आणि रील लाइफ प्रॉडक्शन अंतर्गत करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...