आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईदला रिलीज झालेल्या सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाने 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. दुसऱ्या रविवारी या चित्रपटाने 4.35 कोटींची कमाई केली. आता चित्रपटाचे एकूण कलेक्शन 100.28 झाले आहे. मात्र, सलमानच्या आधीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, किसी का भाई किसी की जानला 100 कोटी क्लबमध्ये सामील व्हायला बराच वेळ लागला.
सलमान खानच्या गेल्या काही चित्रपटांचे रेकॉर्ड पाहता त्या चित्रपटांनी पहिल्याच आठवड्यात 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. दुसरीकडे 2023 मध्ये आतापर्यंत फक्त तीन हिंदी चित्रपट आहेत ज्यांनी 100 कोटी किंवा त्याहून अधिक कमाई केली आहे. त्यात आता या चित्रपटाची वर्णी लागली आहे.
10 व्या दिवशी 100 कोटी क्लबमध्ये एंट्री
सलमानच्या 'भारत' या चित्रपटाने पहिल्या आठवडा संपेपर्यंत सुमारे 180 कोटींची कमाई केली होती. याशिवाय 'दबंग 3' ने रिलीजच्या पहिल्या सात दिवसांत 121 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला होता. तर 'रेस 3' ने देखील पहिल्या आठवड्यात 140 कोटींहून अधिक कमाई केली होती.
'टायगर जिंदा है'ने पहिल्या आठवड्यात 206.04 कोटींची कमाई केली होती. 'ट्यूबलाइट'सारख्या फ्लॉप चित्रपटानेही पहिल्या आठवड्यात 106 कोटींची कमाई केली होती. यानुसार, 'किसी का भाई किसी की जान'चे आकडे सलमान आणि त्याच्या चाहत्यांना निराश करण्यासाठी पुरेसे आहेत.
2023 मध्ये फक्त तीन चित्रपटांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली
'किसी का भाई किसी की जान' व्यतिरिक्त 2023 मध्ये रिलीज झालेल्या फक्त दोन हिंदी चित्रपटांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. शाहरुख खानच्या 'पठाण'ने कमाईच्या बाबतीत इतिहास रचला आहे. या चित्रपटाने 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
दुस-या क्रमांकावर रणबीर कपूरचा 'तू झुठी मैं मक्कार' हा चित्रपट असून त्याचे लाइफटाइम कलेक्शन 146.6 कोटी रुपये आहे. आता या यादीत सलमानच्या 'किसी का भाई किसी जान' सामील झाला आहे. अजय देवगणचा 'भोला' हा चित्रपट 80 कोटींच्या आसपास चौथ्या क्रमांकावर आहे.
यंदाची ईद सलमानसाठी ठरली फिकी
ईदला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांचे ओपनिंग कलेक्शन जबरदस्त असल्याचे सामान्यपणे दिसून येते. 'किसी का भाई किसी की जान' याला अपवाद ठरला. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमानच्या शेवटच्या 8 चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, 'किसी का भाई किसी की जान' मागे राहिला आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेला 'दबंग' चित्रपट वगळता ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या सर्व चित्रपटांनी पहिल्या दिवशी 20 कोटींहून अधिक कमाई केली होती.
2019 मध्ये रिलीज झालेल्या 'भारत'ने पहिल्याच दिवशी 42.30 कोटींचा गल्ला जमवून विक्रम केला. 2012 मध्ये आलेल्या 'एक था टायगर'ने 32.92 कोटींची ओपनिंग केली पण 2023 मध्ये परिस्थिती बदलली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.