आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशुक्रवारी रात्री मुंबईत 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' (NMACC) च्या उद्घाटनासाठी सेलिब्रिटींची मांदियाळी जमली होती. मुकेश अंबानी यांची मुलगी आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या संचालक ईशा अंबानी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमातले अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यातील एक व्हिडिओ तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात सलमान खान शाहरुख खानच्या कुटुंबासोबत पोज देताना दिसत आहे.
प्रसिद्ध छायाचित्रकार विरल भयानी यांनी त्यांच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर सलमानचा शाहरुखच्या कुटुंबासोबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला शाहरुखची पत्नी गौरी खान आपल्या दोन मुलांसोबत कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसते. मग ते मुख्य कार्यक्रमाला जात असताना सलमान खान तिथे येतो. तो गौरीला पुन्हा एकत्र फोटो काढण्याची विनंती करतो आणि ते सर्व एकत्र फोटो काढतात.
चाहत्यांनी केल्या कमेंट
हा व्हिडिओ सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडिओवर चाहतेदेखील कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करताना लिहिले, 'आज जर सलमानचा मुलगा असता तर करण अर्जुनची जोडी बनली असती.' आणखी एका चाहत्याने लिहिले, 'माझा दिवस बनला.'
कार्यक्रमाला शाहरुखची अनुपस्थिती
या कार्यक्रमाला शाहरुख खानची अनुपस्थिती होती. पण त्याची पत्नी मुले आर्यन आणि सुहानासोबत कार्यक्रमाला पोहोचली होती. यावेळी सुहानाचा ग्लॅमरस अंदाजदेखील लक्ष वेधून घेणारा होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.