आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायरसीला बळी पडला 'राधे':सलमान खान स्टारर 'राधे' रिलीजच्या काही तासांतच इंटरनेटवर झाला लिक, OTT प्लॅटफॉर्म झी 5 चा सर्व्हरही झाला होता क्रॅश

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट प्रदर्शित होताच झी 5 चा सर्व्हर क्रॅश झाला होता

सलमान खान स्टारर 'राधेः योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट आज (13 मे) जगभरातील चित्रपटगृहांत आणि OTT-DTH वर 'पे पर व्यू' सेवेअंतर्गत प्रदर्शित झाला आहे. रिलीज झाल्यानंतर काही तासांतच 'राधे' इंटरनेटवरही लीक झाला आहे. 'राधे'ची पायरेटेड आवृत्ती बर्‍याच टॉरेन्ट साइट्स आणि टेलिग्राम अ‍ॅप्सवरून विनामूल्य डाउनलोड करता येऊ शकते. तर सलमान खानने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या एक दिवस आधी एक व्हिडिओ क्लिप प्रसिद्ध केली आणि चाहत्यांना पायरसीपासून दूर राहण्याचे व योग्य व्यासपीठावर चित्रपट पाहण्याचे आवाहन केले होते.

नो पायरसी इन एंटरटेनमेंट : सलमान खान
व्हिडिओमध्ये 55 वर्षीय सलमान खान म्हणाला होता, "पायरसीपासून दूर रहा आणि योग्य प्लॅटफॉर्मवर चित्रपट पहा. चित्रपट करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि जेव्हा काही लोक चित्रपट बघण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबतात, ते पाहून खूप त्रास होतो." व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले होते, "नो पायरसी इन एंटरटेनमेंट." तर टॉरेंट साइट्स आणि टेलिग्राम अ‍ॅप्सवरचित्रपटाची एचडी, 720 पी आणि 1080p पायरेटेड आवृत्ती देखील डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत.

एखादा चित्रपट विनामूल्य पाहण्यासाठी ऑनलाइन लीक झाल्याची ही काही पहिली घटना नाही. जवळजवळ प्रत्येक चित्रपट पायरसीला बळी पडतो. अनेकदा अशा साइट्सवर कडक कारवाई देखील करण्यात आली आहे. मात्र यासारख्या बर्‍याच साइट्स बंदी घातल्यानंतरही अशाप्रकारच्या अनेक साइट्स कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पायरसीला प्रोत्साहन देतात. चित्रपट बनवण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि चित्रपट अशा प्रकारे लीक झाल्यावर निर्मात्यांचे बरेच नुकसान होते. म्हणूनच लोकप्रिय चित्रपट ऑनलाईन ली झाल्यास गंभीर कारवाई करण्याची गरज आहे.

हा चित्रपट प्रदर्शित होताच झी 5 चा सर्व्हर क्रॅश झाला होता
'राधे' हा चित्रपट सिनेमागृहांव्यतिरिक्त ओटीटी प्लॅटफॉर्म झी-प्लेक्ससह झी 5 वरही प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही तासांतच झी 5 चा सर्व्हरही क्रॅश झाला होता. चित्रपटाच्या प्रतीक्षेत असलेल्या यूजर्सनी झी 5 वर मोठ्या प्रमाणात स्ट्रीम करणे सुरु केले. एवढे यूजर्स प्लॅटफॉर्मसाठी हाताळणे कठिण झाले आणि काही काळासाठी सर्व्हर क्रॅश झाला. झी 5 वर हा चित्रपट चालू नसल्यामुळे यूजर्सनी नाराजी व्यक्त केली आणि सोशल मीडियावर त्याबद्दल तक्रारी करण्यास सुरवात केली. पण, झी 5 टीमने तत्काळ परिस्थिती सांभाळली आणि सुमारे एक तासानंतर अॅपने पुन्हा कार्य करणे सुरू केले. प्रभू देवा दिग्दर्शित ‘राधे’ चित्रपटात सलमानशिवाय दिशा पाटनी, जॅकी श्रॉफ, रणदीप हूडा, गोविंद नामदेव आणि गौतम गुलाटी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...