आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साँग आउट:'राधे'चे नवे गाणे 'सीटी मार' रिलीज; डान्स नंबरमध्ये लक्ष वेधून घेतेय सलमान-दिशाची केमिस्ट्री

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यावर्षी ईदला प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे.

‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच 'सीटी मार' हे गाणे खूप चर्चेत असून सोशल मीडियावर हा ट्रॅक चर्चेचा विषय बनला आहे. यातच आज सलमान खानने हा बहुप्रतीक्षित डांस नंबर प्रदर्शित केला आहे. या डान्स नंबरमधील सलमान आणि दिशाची केमिस्ट्री आणि क्रेझी डान्स मुव्स लक्ष वेधून घेणारे आहेत.

अल्लू अर्जुनच्या 'डीजे'मधील ओरिजिनल गाण्याचा हिंदी रिमेक आहे 'सीटी मार'

'सीटी मार' हे गाणे कमाल खान आणि लुलिया वंतूर यांनी गायले असून शब्बीर अहमदने हे गाणे लिहिले आहे. हा ट्रॅक म्युझिक रॉकस्टार संगीतकार देवी श्री प्रसाद (डीएसपी) यांनी कंपोज केला आहे, त्यांनी या आधी सलमानसाठी सेंसेशनल हिट ‘ढिंका चिका’ तयार केला होता. हे गाणे यूट्यूबर रिलीज होताच त्याला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे स्टारर 'डीजे' या तेलुगू चित्रपटातील 'सीटी मार' या गाण्याचा हिंदी रिमेक आहे. आता सलमान आणि दिशाचे 'सीटी मार' हे गाणे रिलीज झाल्यानंतर चाहते या दोन्ही गाण्यांच्या व्हिडिओची तुलनादेखील करत आहेत.

'राधे'मधील ‘सिटी मार’ची हुक स्टेप सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी पुरेशी आहे आणि सलमान खानच्या या हुक स्टेपसोबत, ती प्रचंड व्हायरलदेखील होते आहे. ट्रेलर आणि गाणे पाहिल्यानंतर, यावर्षी ईदला प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळणार आहे.

सलमानने गाण्यासाठी अल्लू अर्जुनचे मानले आभार
सलमान खानने गाण्याचा व्हिडिओ शेअर करत अल्लू अर्जुनचे आभार मानले आहेत. त्याने लिहिले, 'अल्लू अर्जुन तुझे 'सीटी मार' या गाण्यासाठी धन्यवाद. या गाण्यातील तुझी स्टाइल आणि डान्स सगळंच खूप शानदार आहे. सुरक्षित राहा आणि स्वतःची काळजी घे, लव्ह यू ब्रदर,' अशी पोस्ट सलमानने शेअर केली आहे.

स्पेशल कॉपच्या भूमिकेत दिसणार सलमान खान

चित्रपटात सलमान खान स्पेशल कॉप राधेच्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबईत सुरु असलेला अंमली पदार्थांचा व्यापार आणि गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रित करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे. राधेची काम करण्याची स्वतःची एक वेगळी शैली आहे. अगदी 'वाँटेड' (2009) चित्रपटातील भूमिकेसारखीच. ट्रेलरमध्ये सलमान 'वाँटेड'मधील गाजलेला डायलॉग 'एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो अपनी आपकी भी नहीं सुनता' म्हणताना दिसला आहे.

अ‍ॅक्शनने परिपूर्ण असलेल्या ट्रेलरमध्ये सलमान गुन्हेगारांना सळो की पळो करताना दिसतोय. तर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत अभिनेत्री दिशा पाटनी आहे. रणदीप हूडा या चित्रपटाचा मुख्य खलनायक आहे.

सलमान म्हणाला होता - ईद का वादा है ईद पर ही आएंगे
सलमान खानने काही दिवसांपूर्वी 13 मार्च ही प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर केली होती. सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना तो म्हणाला होता, "ईद का कमिटमेंट था, ईद पर ही आएंगे, क्योंकि एक बार जो मैंने...(कमिटमेंट कर दी तो मैं अपनी आपकी भी नहीं सुनता।)"

सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मेला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना 'पे-पर-व्यू' सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येईल.

बातम्या आणखी आहेत...