आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राधे : योर मोस्ट वाँटेड भाई:सलमान खानचा 'राधे' ऑनलाइन आणि टीव्हीवर बघण्यासाठी खर्च करावे लागतील 249 रुपये, ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये होणार रिलीज

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूजर्स घरी बसून आपल्या कुटुंबासमवेत चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.

सलमान खान आणि दिशा पाटनी स्टारर 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हा चित्रपट ईदच्या निमित्ताने 13 मे रोजी थिएटर आणि झी-प्लेक्सच्या सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. झी-प्लेक्सचे ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'झी-5' आणि 'झी-स्टुडिओ' वर यूजर्स 'पे-पर-व्यू' सर्व्हिसद्वारे 'राधे' बघू शकतील.

याचा अर्थ म्हणजे यूजर्सना या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'राधे' पाहण्यासाठी किंमत मोजावी लागेल. झी-प्लेक्सने 'पे-पर-व्यू' सेवेअंतर्गत आपल्या सर्व प्लॅटफॉर्मवर 'राधे' पाहण्यासाठी 249 रुपये किंमत निश्चित केली आहे. ही रक्कम देऊन यूजर्स या प्लॅटफॉर्मवर सहजपणे चित्रपट पाहू शकतील. याशिवाय हा चित्रपट 40 हून अधिक देशांतील थिएटरमध्येही प्रदर्शित होत आहे.

लीडिंग डीटीएच ऑपरेटर्सवरही बघता येईल चित्रपट
हा चित्रपट ‘पे-पर-व्ह्यू’ सेवेअंतर्गत सर्व आघाडीच्या डीटीएच ऑपरेटर्सवरही बघता येणार आहे. यामध्ये डिश टीव्ही, डी 2 एच, टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटल टीव्ही सारख्या ऑपरेटरचा समावेश आहे. या सर्व चॅनेलवर, युजर्स पैसे देऊन 'राधे' पाहू शकतील. सर्व झी-प्लेक्स प्लॅटफॉर्मवर चित्रपटाचे बुकिंग लवकरच सुरू केले जाईल. ज्याअंतर्गत, यूजर्स घरी बसून आपल्या कुटुंबासमवेत चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.

प्रभू देवा दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खानसह दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ हा चित्रपट सलमान खान फिल्म्स झी स्टूडियोसोबत मिळून सादर करत आहेत. इतकेच नाही सलमानने आई सलमा खान, भाऊ सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेडसोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटातील पहिल्याच गाण्याने मोडले सर्व रेकॉर्ड

चित्रपटातील सिटी मार हे गाणे सोमवारी प्रदर्शित करण्यात आले. या गाण्याने सर्वच मंचावर 30 मिलियन व्ह्यूजचा आकडा पार केला असून 24 तासात जगभरातील सर्वाधिक पाहिले गेलेले गाणे ठरले आहे. प्रदर्शनानंतर काही वेळातच, हे गाणे ट्विटरवर ट्रेंड झाले होते. तसचे ‘सिटी मार’ या गाण्याला यूट्यूबवर 2 लाख लाईक्स मिळाले आहेत. इतक्या कमी वेळात यूट्यूबवर 2 लाख लाइक्स मिळणारे हे बॉलिवूडमधील पहिले गाणे ठरले आहे.

स्पेशल कॉपच्या भूमिकेत दिसणार सलमान खान

चित्रपटात सलमान खान स्पेशल कॉप राधेच्या भूमिकेत दिसणार आहे. मुंबईत सुरु असलेला अंमली पदार्थांचा व्यापार आणि गुन्हेगारीचे प्रमाण नियंत्रित करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे. राधेची काम करण्याची स्वतःची एक वेगळी शैली आहे. अगदी 'वाँटेड' (2009) चित्रपटातील भूमिकेसारखीच. ट्रेलरमध्ये सलमान 'वाँटेड'मधील गाजलेला डायलॉग 'एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो अपनी आपकी भी नहीं सुनता' म्हणताना दिसला आहे.

अ‍ॅक्शनने परिपूर्ण असलेल्या ट्रेलरमध्ये सलमान गुन्हेगारांना सळो की पळो करताना दिसतोय. तर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत अभिनेत्री दिशा पाटनी आहे. रणदीप हूडा या चित्रपटाचा मुख्य खलनायक आहे.

बातम्या आणखी आहेत...