आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानच्या घरात कोरोनाचा शिरकाव:सलमान खानच्या ड्रायव्हरला करोनाची लागण, सलमानसह खान कुटुंबीय आयसोलेट; आईवडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले रद्द

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रत्येक स्टाफ मेंबरची कोरोना चाचणी करण्यात आली.

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या दोन स्टाफ मेंबर्ससह त्याच्या कार चालकाला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सलमानने स्वतःला आयसोलेट करुन घेतले आहे. या कर्मचाऱ्यांना मुंबईतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसंच पुढील 14 दिवस सलमान आणि त्याचे कुटुंबीय आयसोलेटमध्ये राहणार आहेत.

‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार, सलमानचा कारचालक अशोकला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक स्टाफ मेंबरची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर घरातील अन्य दोन स्टाफ मेंबरला कोरोना झाल्याचे समोर आले. त्यानंतर सलमान सध्या आयसोलेट झाला आहे.

आईवडिलांच्या वेडिंग एनिव्हर्सरीचे सेलिब्रेशन करावे लागले रद्द
पिंकविलाच्या वृत्तानुसार, सलमान खान आणि त्याचे बहीणभावंड त्यांचे आईवडील सलमा खान आणि सलीम खान यांच्या लग्नाच्या 55 व्या वाढदिवसाचे जल्लोषात सेलिब्रेशन करणार होते. 18 नोव्हेंबर रोजी हे सेलिब्रेशन होणार होते. मात्र सद्यपरिस्थितीमुळे कार्यक्रम रद्द करावा लागला. सध्या खान कुटुंबीयांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

'बिग बॉस'चे चित्रीकरण करु शकणार नाही सलमान?
सलमान सध्या आयसोलेट होण्याने त्याच्या कामावरही मोठा परिणाम होणार आहे. कारण, सध्या सलमानच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स आहेत. लॉकडाऊननंतर काही दिवसांपूर्वीच त्याने 'राधे : योर मोस्ट वाँटेड भाई' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु केले होते. तसेच, तो बिग बॉस-14 या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरादेखील सांभाळतोय. सलमान आयसोलेट झाल्याने या आठवड्यात तो बिग बॉस या शोच्या 'वीकेंड का वॉर' या एपिसोडचे चित्रीकरण करु शकणार की नाही यावरही सस्पेन्स आहे. एकंदरीत त्याच्या कामावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर टाकली होती पोस्ट

सलमान खान सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतो आणि सातत्याने त्यावर अपडेट करत असतो. दोन दिवसांपूर्वीच त्याने आपल्या बीइंग ह्युमन या क्लोदिंग ब्रॅण्डच्या विंटर कलेक्शनचे प्रमोशन करणारी पोस्ट टाकली होती. यात तो शर्टलेस होऊन घोड्यावर स्वार झालेला दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...