आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमान आयसोलेशनमध्ये ?:ड्रायव्हरसह 3 स्टाफ मेंबर्सना कोरोना झाल्याचा दावा; मात्र बॉडीगार्ड शेरा म्हणाला- सलमानच्या कोणत्याही कर्मचा-याला कोरोनाची लागण झालेली नाही

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमानच्या स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण झालेली नाही.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा बॉडीगार्ड शेरा याने सलमानसह खान कुटुंबीय आयसोलेशनमध्ये असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. दिव्य मराठीसोबत झालेल्या खास संभाषणात शेरा म्हणाला, 'भाई फिल्म सिटीमध्ये बिग बॉस -14 चे शूटिंग करत आहे. ते आयसोलेशनमध्ये नाहीत. लवकरच ते फिल्म सिटीमध्येच आयुष शर्माच्या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात करणार आहे. भाईचा कार चालक अशोक ठीक आहे. कोणत्याही ड्रायव्हरला काहीही झाले नाही', अशी माहिती शेराने दिली.

कोरोनाची बातमी कशी पसरली माहित नाही?
शेरा पुढे म्हणाला, "कोरोनाची बातमी कशी पसरली माहित नाही. कदाचित दुसर्‍या टीममधील कुठल्या कार चालकाला कोरोना झाला असावा. जरी त्यांच्या बाबतीत असे काही घडले असले तरीदेखील ते सलमान भाईच्या संपर्कात आलेले नाहीत. त्यामुळे सलमान भाई किंवा त्यांची कोर टीम आयसोलेट नाही', असे शेराने सांगितले.

रिपोर्ट्स काय आहे दावा?

सलमान खानच्या दोन स्टाफ मेंबर्ससह त्याच्या कार चालकाला कोरोनाची लागण झाली असून सलमानसह खान कुटुंबीय पुढील 14 दिवस आयसोलेटमध्ये राहणार असल्याचे अनेक रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले होते.

सलमानचा कारचालक अशोकला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक स्टाफ मेंबरची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर घरातील अन्य दोन स्टाफ मेंबरला कोरोना झाल्याचे समोर आले. त्यानंतर सलमान सध्या आयसोलेट झाला आहे, अशी माहिती समोर आली होती. मात्र आता शेराने या वृत्ताचे खंडन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...