आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
काेराेनामुळे बाॅलिवूडमध्ये डेलीवेजेस वर्कर्ससाेबतच ज्युनियर डान्सर्स यांनाही फटका बसला होता. आधी मोठ्या कलाकारांच्या चित्रपटात गाण्यांच्या चित्रीकरणासाठी 100 पेक्षा जास्त ज्युनियर डान्सर्स असायचे. मात्र लॉकडाऊन प्रोटोकॉलमुळे गेल्या वर्षी कोणत्याही चित्रपटाच्या गाण्यासाठी 20 ते 25 पेक्षा जास्त लोकांना एकत्र करण्याची परवानगी नव्हती. मात्र शूटिंग नव्याने सुरू झाली तेव्हा बऱ्याच गोष्टी रुळावर आल्या. त्यामुळे वरुण धवन, सलमान खान आणि आयुष शर्मा मिळून ‘अंतिम’ चित्रपटातील एका विशेष गाण्यासाठी 110 ज्युनियर डान्सर्सला घेण्यात आले आहे.
काम सुरू झाल्याने ज्युनियर डान्सर्समध्ये आनंदाचे वातावरण
चित्रपटाच्या या महत्त्वाच्या गाण्याचे शूटिंग गाेरेगाव फिल्म सिटीमध्ये झाले. या चित्रीकरणात सलमान, वरुण आणि आयुष एका फ्रेममध्ये दिसले. सूत्रानुसार, हे गाणे गणपतीवर आधारित आहे.
रात्री सुरू आहे शूटिंग
वरुण धवन नाइट शिफ्टमध्ये गाणे पूर्ण करत आहे. यासाठी चार वाजताच सर्व जमा होतात, तर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पॅकअप होते. नाइट शिफ्टमध्ये शूटिंगचे कारणही देण्यात आले आहे. कारण गाण्यात गणपती विसर्जन दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे संध्याकाळपासून ते रात्रीचे सीन चित्रित केले जात आहेत. त्यामुळे सतत काम सुरू आहे. या गाण्याची कोरियोग्राफी मुदस्सर खान आणि चिन्नी प्रकाश यांनी केली आहे.
यापूर्वीदेखील वरुणने ‘जुडवां 2’ मध्ये गणपतीवर डान्स नंबर केले हाेते. या गाण्यात जवळजवळ 110 ज्युनियर डान्सर्सनेेदेखील डान्स केला. त्यांचे काम सुरू झाल्याने ज्युनियर डान्सर्स खूपच खुश आहे. हे गाणे चित्रित करण्यासाठी पाच दिवस लागणार आहेत. तीन दिवसांचे शूटिंग झाले आहे. दरदिवशी वरुण-सलमानच्या मागे 110 डान्सर्स लागत आहेत. सेटवर पोलिसांच्या देखरेखीत शूटिंग सुरू आहे. शारीरिक अंतराचेही पालन केले जात आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.