आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानची घोषणा:'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई'ची रिलीज डेट सांगताना सलमान खान म्हणाला -  'ईदची कमिटमेन्ट दिली होती, ईदलाच येणार क्यूं की....'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राधे अगदी दोन महिन्यांनंतर म्हणजे 13 मे रोजी रिलीज होईल.

अभिनेता सलमान खानने आपल्या आगामी ‘राधेः योर मोस्ट वाँटेड’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना त्याने लिहिले की, 'ईदची कमिटमेन्ट दिली होती. ईदलाच येणार क्यू की एक बार जो मैने…” असे खास कॅप्शन त्याने दिले आहे. राधे अगदी दोन महिन्यांनंतर म्हणजे 13 मे रोजी रिलीज होईल, असे सलमानने सांगितले आहे.

वाढदिवशी म्हणाला होता - लोकांच्या आरोग्याला प्राथमिकता आहे

डिसेंबरमध्ये सलमान खानच्या 55 व्या वाढदिवशी जेव्हा 'राधे' कधी प्रदर्शित होईल, असा प्रश्न त्याला विचारला असता तो म्हणाला होता, हा चित्रपट ईदला तेव्हाच रिलीज होईल, जेव्हा परिस्थिती ठीक असेल आणि लोक थिएटरमध्ये जाऊ लागतील. सलमानने म्हटले होते की, "सध्या परिस्थिती ठीक नाहीये. थिएटरमध्ये जाऊन कुणी आजारी पडले, किंवा कुणाचा मृत्यू ओढवला तर ते योग्य नाही. परिस्थिती ठीक झाल्यानंतर संधी पाहून रिलीज केला जाईल. कारण लोकांचे आरोग्य आणि जीवन अधिक महत्वाचे आहे."

जानेवारीमध्ये वितरकांना दिला होता शब्द
थिएटर एक्झिबिटर असोसिएशनने सलमान खानला आपला चित्रपट ईदला थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याची विनंती केली होती. कारण 'राधे' प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे खेचू शकतो आणि आर्थिक नुकसानीतून वर येण्यासाठी या चित्रपटाची त्यांना मदत होईल, असे त्यांचे मत आहे. विशेष म्हणजे सलमानला त्याचा राधे हा चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल 250 कोटींची ऑफर मिळाली होती. मात्र सलमानने ओटीटीला नकार दिला. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटरमध्येच प्रदर्शित होईल, असा निर्णय सलमानने घेतला. कोरोनामुळे देशातील अनेक सिनेमागृहे बंद होती. त्यामुळे अनेक मोठ्या चित्रपटांनी सिनेमागृहांची वाट पाहण्याऐवजी ओटीटी पर्याय निवडला. सलमानने मात्र कुठल्याची परिस्थितीत चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करणार असल्याची भूमिका घेतली.

प्रभुदेवाने सांभाळली दिग्दर्शनाची धुरा

सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे. चित्रपटात सलमानसह जॅकी श्रॉफ, दिशा पाटनी आणि रणदीप हुड्डा हे देखील लीड रोलमध्ये दिसतील. हा चित्रपट 2009 मध्ये आलेल्या वाँटेड या चित्रपटाचा सिक्वेल आहे. रिपोर्ट्सनुसार, 'राधे: योर मोस्ट वाँटेड भाई' कोरियन फिल्म 'द आउटलॉज'चा हिंदी रिमेक आहे, असेही म्हटले गेले आहे.

बातम्या आणखी आहेत...