आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भाईजान'चा न्यू प्रोजेक्ट:सलमानला इंडस्ट्रीत 34 वर्षे पूर्ण, 'किसी का भाई... किसी की जान' चित्रपटाची केली घोषणा

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला इंडस्ट्रीत नुकतीच 34 वर्षे पूर्ण झाली आहेत. 26 ऑगस्ट 1988 रोजी त्याचा 'बीवी हो तो ऐसी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, या चित्रपटात त्याची छोटी भूमिका होती. त्यानंतर वर्षभरानंतर 1989 मध्ये 'मैंने प्यार किया'मध्ये सलमान नायकाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटात त्याने प्रेमची भूमिका साकारली होती. सिनेसृष्टीत 34 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सलमानने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो लांब केसात दिसत असून त्याचा लूक लक्ष वेधून घेतोय. यासह त्याने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.

व्हिडिओ केला शेअर
सलमान खानने आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान लांब केस आणि चष्म्यात दिसतोय. व्हिडिओ शेअर करन सलमान म्हणाला, '34 वर्षांपूर्वी होता आणि आता 34 वर्षांनंतर आता आहे, माझ्या आयुष्याचा प्रवास कोठूनही सुरू झाला असला तरी, 2 शब्दांचा बनला आहे. तेव्हा आणि आता माझ्यासोबत राहण्यासाठी धन्यवाद 'किसी का भाई किसी की जान'. असे म्हणत सलमानने त्याच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.

सलमानचा हा व्हिडिओ चाहत्यांना तुफान आवडला आहे. एका यूजरने लिहिले, 'भाईजान पुन्हा एकदा अॅक्शनचे वादळ घेऊन येतोय आणि तेही आपल्या स्टाइलमध्ये...'

आपल्या 34 वर्षांच्या कारकिर्दीत सलमान खानने 'हम आपके है कौन', 'हम साथ साथ है', 'दबंग', 'वॉन्टेड', 'एक था टायगर', 'बजरंगी'सह अनेक हिट सिनेमे दिले आहेत. सोशल मीडियावर सलमानच्या चाहत्यांनी #34YearsOfSalmanKhanEra हा ट्रेंड केला आहे.

'कभी ईद कभी दिवाली'चे शीर्षक बदलले?
सध्या सलमान 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव बदलून 'भाईजान' ठेवण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, सलमानने याच चित्रपटाचे नाव 'किसी का भाई.. किसी की जान' ठेवल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. 'भाईजान'मध्ये सलमानशिवाय पूजा हेगडे, शहनाज गिल, राघव यांच्याही भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...