आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानला पुन्हा दिलासा:काळवीट शिकार प्रकऱणात आठ महिन्यांत सहाव्यांदा चौकशीस हजर राहण्यापासून मिळाली मुभा, आता पुढील वर्षी होणार सुनावणी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमानने कोरोनाचा धोका पत्करु शकत नाही, असे कारण देत कोर्टाकडे हजर न राहण्याबाबत माफी मागितली होती.
  • लोअर कोर्टाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती, सलमानने या निर्णयाला आव्हान दिले आहे.

काळवीट शिकार प्रकरणाच्या सुनावणीसाठी अभिनेता सलमान खान मंगळवारी पुन्हा एकदा कोर्टात हजर झाला नाही. राजस्थानच्या सेशन कोर्टामध्ये सलमानची सुनावणी होती. पण तो कोर्टात हजर राहू शकणार नाही अशी माहिती त्याच्या वकिलांनी दिली. यासोबतच वकिलांनी कोर्टामध्ये अटेंडन्स अपोलॉजी सादर केली. न्यायाधिशांनी त्याचा स्वीकार केला असून पुढील सुनावणी 16 जानेवारी रोजी होणार आहे.

यावेळी सलमानने स्वत: तिथे उपस्थित राहणे आवश्यक होते. पण मुंबई आणि राजस्थानमध्ये कोरोना भरपूर वाढला आहे. त्यामुळे हा धोका मी पत्करु शकत नाही. असे कारण देत सलमानने तिथे जाण्याचे टाळले. आता पुढील वर्षी म्हणजे 16 जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. कोरोनाच्या काळात आठ महिन्यांत सहा वेळा सलमान कोर्टात गैरहजर राहिला आहे. याप्रकरणी आतापर्यंत 15 वेळा तो कोर्टात गैरहजर राहिला आहे.

विशेष म्हणजे, सलमान खानला 5 एप्रिल 2018 रोजी या प्रकरणात दुय्यम कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर सलमानने शिक्षेविरोधात जिल्हा आणि सत्र जिल्हा न्यायालयात अपील केले आहे. त्याचबरोबर आर्म्स अ‍ॅक्ट प्रकरणात सलमानला निर्दोष सोडण्याच्या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारने एक आव्हान दिले आहे. आज या दोन्ही खटल्यांची सुनावणी होणार होती.

काय आहे प्रकरण?
काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 चे आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाचे शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला. यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत. 12 ऑक्टोबर 1998 रोजी सलमानला काळवीट शिकार प्रकरणी अटक करण्यात आली होती. काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.

शिक्षेनंतर सलमानची रवानगी जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती. सध्या सलमान जामिनावर बाहेर आहे. सलमानने ट्रायल कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्याचप्रमाणे, 1998 मध्ये परवाना कालावधी संपला असूनही सलमानवर शस्त्रे ठेवल्याचा आरोप होता. त्यानंतर सलमानला या प्रकरणात निर्दोष सोडण्यात आले. राज्य सरकारने कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे. तर त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser