आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शेरशाह'चे निर्माता शबीर बॉक्सवाला यांचा खुलासा:विक्रम बत्रांच्या भूमिकेसाठी सिद्धार्थ मल्होत्राच्या जागी मेहुणा आयुष शर्माला कास्ट करण्यासाठी सलमान खानने साधला होता संपर्क

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमानने संपर्क साधला होता

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ​'शेरशाह' या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वत्र कौतुक होत आहे. पण चित्रपटातील कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका मेहुणा आयुष शर्माने साकारावी अशी अभिनेता सलमान खानची इच्छा होती. चित्रपटाचे निर्माते शब्बीर बॉक्सवाला यांनी अलीकडेच एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

सलमान खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा
सलमान खान आणि सिद्धार्थ मल्होत्रा

सलमानने संपर्क साधला होता
मुलाखतीत शब्बीर यांनी सांगितले, जेव्हा जंगली पिक्चर्ससह मी हा चित्रपट बनवण्याची योजना आखत होतो, तेव्हा सलमानने माझ्याशी संपर्क साधला होता. 'शेरशाह' हा आयुष शर्माचा डेब्यू चित्रपट असावा अशी सलमान खानची इच्छा होती. सोबतच तो चित्रपटाचा सहनिर्माता व्हायला देखील तयार होता. पण हा योग जुळून आला नाही. कारण सिद्धार्थची विक्रम बत्रा यांच्या कुटुंबियांशी भेट झाली होती आणि त्यांना सिद्धार्थलाच विक्रम बत्रांच्या भूमिकेत पाहायचे होते.शब्बीर पुढे म्हणाले, जर मी त्या वेळी दुस-या अभिनेत्यासाठी सिद्धार्थला चित्रपटातून काढून टाकले असते तर ही गोष्ट खूप चुकीची झाली असती. जेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या कुटुंबाने मला अधिकार दिले, तेव्हा तो माझ्यासाठी मोठा क्षण होता. त्यांनी माझ्यावर अतूट विश्वास दाखवला आणि मला कोणतेही चुकीचे पाऊल उचलून त्यांना निराश करायचे नव्हते. जेव्हा मी सलमानला हे सांगितले तेव्हा त्याने माझी कोंडी समजून घेतली आणि माझे म्हणणे ऐकले.

आयुष शर्मा आणि सलमान खान.
आयुष शर्मा आणि सलमान खान.

'लवयात्री'द्वारे आयुषचे झाले पदार्पण

'शेरशाह' या चित्रपटात भूमिका न मिळाल्यानंतर आयुषने सलमान खान प्रॉडक्शन हाऊसच्या 'लवयात्री'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, पण त्याचा पदार्पणातील चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्याचा आगामी चित्रपट 'अंतिम : द फायनल ट्रुथ' आहे ज्यात सलमान खानही दिसणार आहे. आयुष हा सलमानची बहीण अर्पिता खानचा नवरा आहे.

दुसरीकडे, 'शेरशाह' या चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास, कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या भूमिकेत सिद्धार्थ मल्होत्राला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. कॅप्टन विक्रम बत्रा 1999 मध्ये कारगिल युद्धात शहीद झाले होते. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...