आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस आयुक्तांच्या मुलीच्या वेडिंग रिसेप्शनला पोहोचला सलमान:लाल साडीत दिसली शिल्पा शेट्टी, रणवीर सिंगने दिला दमदार परफॉर्मन्स

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

17 डिसेंबर रोजी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची मुलगी मैत्रेयी फणसाळकर हिच्या लग्नाचे रिसेप्शन होते. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या सोहळ्याला हजेरी लावली. अभिनेता सलमान खान, रणवीर सिंग, अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी मैत्रेयी फणसाळकर हिच्या लग्नाच्या रिसेप्शनला हजेरी लावली. या रिसेप्शन सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सलमान खानने फणसाळकर कुटुंबासोबत फोटोग्राफर्सना पोझ दिली, तर रणवीर सिंगने रिसेप्शनमध्ये खास परफॉर्मन्स दिला. यावेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टीही फणसाळकर कुटुंबात दिसली. मैत्रेयी ही विवेक फणसाळकर यांची एकुलती एक लेक आहे.

सलमानने नवदाम्पत्याला दिल्या शुभेच्छा
मैत्रेयीचा रिसेप्शन सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला होता. सलमान खान काळ्या रंगाचा सूट परिधान करून कार्यक्रमात पोहोचला आणि त्याने वधू-वरांबरोबर पोज दिल्या.

लग्नात रणवीर सिंग नेहमीप्रमाणेच अगदी वेगळ्या अंदाजात दिसला. यावेळी रणवीरने परफॉर्म केला. त्याने त्याच्या सिम्बा या हिट चित्रपटातील आँख मारे हे गाणे गायले आणि त्यावर डान्सही केला. उपस्थितांनीही त्याच्याबरोबर गाणे गायले आणि त्याला दाद दिली.

लाल साडीत शिल्पा दिसली स्टायलिश
पोलिस आयुक्तांच्या मुलीच्या रिसेप्शनला शिल्पा शेट्टीनेही हजेरी लावली होती. शिल्पा शेट्टी लाल रंगाची साडी नेसून या कार्यक्रमात पोहोचली होती. तिनेही नवविवाहित जोडपे आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर फोटो काढले.

सलमान आणि रणवीरचे आगामी प्रोजेक्ट्स
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर रणवीर सिंग लवकरच 'सर्कस'मध्ये दिसणार आहे. तर सलमान शाहरुखच्या 'पठाण' चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे. याशिवाय एप्रिलमध्ये सलमान खानचा 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीजसाठी सज्ज आहे.

बातम्या आणखी आहेत...