आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एअरपोर्टवर भाईजान:कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बुलेट प्रूफ कारमधून विमानतळावर पोहोचला सलमान खान, दबंग टूरसाठी कोलकात्याला रवाना

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खान नुकताच मुंबईतील कलिना विमानतळावर दिसला. दबंग टूरसाठी तो मुंबईहून कोलकात्याला रवाना झाला आहे. सलमानचा विमानतळावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये नेहमीप्रमाणे हॅण्डसम दिसतोय. यावेळी त्याच्यासोबत मनीष पॉलही दिसला.

कडक सुरक्षा व्यवस्थेत विमानतळावर पोहोचला
गेल्या अनेक दिवसांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे सलमानला Y+ सुरक्षा पुरवण्यात आली आहे. कडक सुरक्षा व्यवस्थेत तो त्याच्या बुलेट प्रूफ कारमधून विमानतळावर पोहोचला. यादरम्यान भाईजानने पापाराझींना अभिवादनही केले.

कोलकाता येथे होणार दबंग टूर कॉन्सर्ट

सलमानने दबंग कॉन्सर्टचे आयोजन परदेशात देखील केले आहे. सलमान आता कोलकाता येथे दबंग टूर करतोय. 13 मे 2023 रोजी कोलकाता येथील ईस्ट बंगाल क्लबमध्ये सलमानच्या दबंग टूर कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. एका रिपोर्टनुसार, सलमानच्या दबंग टूरच्या तिकिटांची किंमत 699 रुपयांपासून 40,000 रुपयांपर्यंत आहे. इतकेच नाही तर तुम्हाला लाउंजमध्ये प्रवेश हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला 2 लाख ते 3 लाख रुपये मोजावे लागतील.

सलमान खानच्या दबंग टूर कॉन्सर्टमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात. प्रभू देवा, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस, गायक गुरु रंधावा, आयुष शर्मा आणि मनीष पॉल यांसारखे सेलिब्रिटी कोलकातामध्ये सलमानसोबत स्टेजवर परफॉर्म करताना दिसणार आहेत.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत

रिपोर्टनुसार, दबंग टूरच्या दरम्यान सलमान खान हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेट घेणार आहे. शो सुरू होण्यापूर्वी सलमान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहे.

सलमान खानचे चित्रपट
सलमान खान नुकताच 'किसी का भाई किसी की जान' या फॅमिली ड्रामामध्ये दिसला होता. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी आणि व्यंकटेश दग्गुबती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मात्र हा मल्टीस्टारर चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

आता सलमान लवकरच 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, इमरान हाश्मी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मनीष शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट नोव्हेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.