आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉरेन्सने 2 वेळा आखली होती सलमानवर हल्ल्याची योजना:एकदा पिस्तुलाची रेंज कमी पडली, दुस-यांदा रायफल मागवली पण शार्प शूटर पकडला गेला

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसऱ्यांदा स्प्रिंग रायफलने हल्ल्याची केली होती तयारी

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला धमकीचे पत्र मिळाल्यानंतर या प्रकरणी आता दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. पोलिस चौकशीत सौरभ महाकाळने सलमानला गँगस्टर लॉरेन्सकडून धमकी मिळाली असल्याचे उघड केले आहे. महाकाळ लॉरेन्सच्या जवळची व्यक्ती आहे. आता अलीकडेच असे समोर आले आहे की, लॉरेन्सने संपत नेहरा नावाच्या शूटरला सलमानला मारण्यासाठी पाठवले होते. पण तो त्याच्या योजनेत यशस्वी होऊ शकला नाही.

गोळी झाडणार होता संपत
सूत्रांच्या माहितीनुसार, 2021 मध्ये लॉरेन्सने सलमानला मारण्यासाठी संपत नेहराला नियुक्त केले होते. योजनेनुसार तो मुंबईलाही पोहोचला होता. तो मुंबईच्या वाशी भागात राहत होता आणि त्याने सलमानच्या घराची म्हणजेच 'गॅलेक्सी अपार्टमेंट'ची रेकीदेखील केली होती. संधी पाहून संपतने सलमानवर गोळी झाडण्याचा प्लॅनही आखला होता. मात्र, त्याच्याकडे असलेल्या पिस्तूलाने दूरवरचा निशाणा साधणे शक्य नव्हते. सलमान नेहमीच अंगरक्षकांच्या घे-यात असतो. त्यामुळे हा हल्ला अयशस्वी होईल या भीतीने संपतने विश्नोईच्या सांगण्यावरून हल्ल्याची योजना रद्द केली होती.

सलमान सायकलवरून फिरत असताना संपत त्याच्यावर हल्ला करणार होता.
सलमान सायकलवरून फिरत असताना संपत त्याच्यावर हल्ला करणार होता.

दुसऱ्यांदा स्प्रिंग रायफलने हल्ल्याची केली होती तयारी
संपतने दुसऱ्यांदा हल्ला करण्याची योजना आखली. यावेळी त्याने आपल्या गावातील दिनेश फौजी याच्याकडून आरके स्प्रिंग रायफल खरेदी केली होती. बिष्णोईने ही रायफल त्याच्या ओळखीच्या अनिल पंड्याकडून 3-4 लाखांना विकत घेतली होती, मात्र ही रायफल दिनेशकडे असतानाच त्याला पोलिसांनी पकडले होते. यानंतर संपत नेहरालाही अटक करण्यात आली होती. इतकेच नाही तर 'रेडी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानही लॉरेन्सने सलमान खानवर हल्ल्याची योजना आखली होती, पण ती यशस्वी होऊ शकली नाही.

संपत हा राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होता
संपत नेहरा हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा उजवा हात आहे. तो चंदीगड पोलिसातील निवृत्त सहायक उपनिरीक्षक रामचंदर यांचा मुलगा आहे. एवढेच नाही तर संपत हा राष्ट्रीय स्तरावरील डीकॅथलॉन (हर्डल रेस) रौप्यपदक विजेता देखील आहे. शिक्षणादरम्यान संपत गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात आला. त्याने लॉरेन्सला प्रत्येक गुन्ह्यात साथ दिली आणि हळूहळू तो त्याचा राइट हँड बनला. संपत हा लॉरेन्स टोळीचा शार्प शूटरही आहे.

बातम्या आणखी आहेत...