आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगवर परतला सलमान:शस्त्र परवाना मिळाल्यानंतर 'कभी ईद कभी दिवाली'च्या शूटिंगवर परतला भाईजान, विमानतळावर दिसला

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमान गुलाबी रंगाच्या शर्टमध्ये एअरपोर्टवर पोहोचला होता.

सलमान खानला मुंबई पोलिसांनी शस्त्र परवाना दिला आहे. यानंतर सलमान पुन्हा शूटिंगवर परतला आहे. रिपोर्ट्सनुसार, भाईजान त्याच्या आगामी 'कभी ईद कभी दिवाली' चित्रपटाच्या शूटिंगवर परतला आहे. 56 वर्षीय सलमान सोमवारी रात्री मुंबई विमानतळावर दिसला. यावेळी अडीच कोटींच्या लँड क्रूझर कारमधून सलमान गुलाबी रंगाच्या शर्टमध्ये एअरपोर्टवर पोहोचला होता. जीवे मारण्याची धमक्या मिळाल्यानंतर सलमानने आत्मसंरक्षणासाठी बंदूक परवान्यासाठी अर्ज केला होता.

आदल्या दिवशीच मिळाला शस्त्र परवाना
सलमान खानला मुंबई पोलिसांनी शस्त्र परवाना दिला आहे. खरं तर, काही दिवसांपूर्वी सलमान खानने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. 5 जून रोजी सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यात सलमान लवकरच तुझा मूसेवाला करु अशी धमकी देण्यात आली होती. सोमवारी सलमान खानला शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

कार बुलेट प्रूफ केली
याआधी सलमानने आपली कार अपग्रेड करुन घेतली होती. त्याने आपली लँड क्रूझर कार बुलेटप्रूफ करून घेतली आणि आर्मर बसवून घेतले. यासोबतच त्याच्या कारच्या सर्व काचा बुलेटप्रूफ करुन घेतल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे लँड क्रूझरचे नवीन मॉडेल नसून जुन्या मॉडेलचेच अपग्रेड व्हर्जन आहे.

असे मिळाले होते सलमानला धमकीचे पत्र
सलमानचे वडील सलीम खान नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले होते. फिरुन आल्यानंतर सलीम खान यांना एक निनावी पत्र आले, ज्यामध्ये त्यांना आणि सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सलमान खान तुझा मूसेवाला करु अशी धमकी या पत्रात देण्यात आली होती. या धमकीच्या पत्रानंतर सलीम खान यांनी आपल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानंतर याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनीही सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली असून त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या घराबाहेर पोलिसांचे विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. त्याचवेळी पोलिसांनी सलमानला त्याला पब्लिक अपिअरन्स कमी करण्यास सांगितले होते. त्यामुळेच यंदा ईदला सलमान त्याच्या चाहत्यांना भेटू शकला नव्हता.

'कभी ईद कभी दिवाली'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे सलमान
सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर सलमान सध्या 'कभी ईद कभी दिवाली'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात सलमानसह पूजा हेगडे, शहनाज गिल आणि क्रिती सेनॉन महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सलमानने या चित्रपटांच्या कलाकारांच्या यादीत दाक्षिणात्य अभिनेता जगपती बाबूचीही वर्णी लावली आहे. काही काळापूर्वी चित्रपटाचे शीर्षक बदलल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...