आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आज (2 मार्च) या चित्रपटातील दुसरे गाणे 'बिल्ली बिल्ली' रिलीज झाले आहे. या गाण्यात सलमान खान पूजा हेगडेसोबत थिरकताना दिसतोय. सोबतच श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आणि बिग बॉस फेम शहनाज गिल यांचीही झलक या गाण्यात दिसतये. याशिवाय भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबती हेदेखील या गाण्यात दिसले. हे गाणे गायक सुखबीरने गायले असून गाण्याचे बोल कुमार यांनी लिहिले आहेत. हे गाणे सलमानच्या चाहत्यांना भलतेच आवडले आहे.
बुधवारी सलमानने या गाण्याचा एक टिझर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. टिझरमध्ये हे गाणे चाहत्यांना आवडले होते. आता संपूर्ण गाणे समोर आल्यावर चाहते या चित्रपटासाठी खूपच एक्साइटेड दिसत आहे. सलमानने गाण्याचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. त्यानंतर चाहत्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सलमानचा स्वॅग आवडला, अशी कमेंट नेटकऱ्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे याआधी चित्रपटातील नइयो लगदा हे पहिले गाणे रिलीज झाले होते. या गाण्यातील डान्स स्टेप्स आणि लोकेशनमुळे हे गाणे ट्रोल झाले होते. पण आता त्याचे हे दुसरे गाणे चाहत्यांना आवडले आहे.
सलमानने हटके अंदाजात केले होते या गाण्याचे प्रमोशन
सलमान खानने अलीकडेच हटके अंदाजात एक व्हिडिओ शेअर करून या 'बिल्ली बिल्ली' या गाण्याची घोषणा केली आहे सलमानने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये दोन मांजरी दिसत आहेत.
सलमानने हा व्हिडिओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझे 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटातील गाणे 2 मार्चला रिलीज होत आहे.' सलमान खानने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दोन मांजरी दिसत आहेत, तर पार्श्वभूमीत बिल्ली बिल्ली हे गाणे ऐकू येत आहे. 'किसी का भाई किसी की जान'चे दुसरे गाणे 2 मार्चला रिलीज होणार आहे.
ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे चित्रपट
सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.