आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या लुंगीमध्ये दिसला सलमान खान:नवा अवतार पाहून चाहत्यांनी विचारले – 'किसी का भाई किसी की जान'मधील नवा लूक आहे का?

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच बॉलिवूडच्या भाईजानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसतोय. या व्हिडिओमध्ये सलमानने काळ्या रंगाची लुंगी घातलेली दिसतेय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सलमानचा हा लूक त्याचा आगामी चित्रपट 'किसी का भाई किसी की जान'मधील असल्याचा अंदाज चाहते वर्तवत आहेत.

सेटवर झेड प्लस सुरक्षेत दिसला सलमान

सेटमधून बाहेर आल्यानंतर सलमान आपल्या कारच्या दिशेने वेगाने जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यादरम्यान त्याच्या आजूबाजूला झेड प्लस सुरक्षाही दिसतेय.

100 कोटी आहे या चित्रपटाचे बजेट

'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचे बजेट 100 कोटी रुपये आहे. हा चित्रपट फरहाद सामजी दिग्दर्शित करत असून सलमानच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली त्याची निर्मिती करण्यात आली आहे. या चित्रपटात सलमानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल आणि पलक तिवारीही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आधी हा चित्रपट डिसेंबर 2022 मध्ये रिलीज होणार होता, पण आता तो 21 एप्रिल 2023 रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.

सलमानचे आगामी चित्रपट
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच 'टायगर-3' या चित्रपटात दिसणार आहे. यासोबत तो 'किसी का भाई, किसी की जान' या चित्रपटात दिसणार आहे. शिवाय त्याचा 'दबंग-4' हा चित्रपटही पाइपलाइनमध्ये आहे. यासोबतच सलमान खान बॉलिवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटातही एका खास भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो एक कॅमिओ करणार असल्याचे वृत्त आहे. आणि आता चाहते त्याला पडद्यावर पाहण्यास आतुर आहेत.

बातम्या आणखी आहेत...