आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरा 'भाईजान':सलमानच्या 'राधे'मध्ये या तरुणाने केले बॉडी डबलचे काम, शेअर केला बिहाइंड द सीन फोटो, एकसारख्या ड्रेसमध्ये दिसले दोघे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • परवेज काझी हा तरुण चित्रपटांमध्ये सलमानच्या बॉडी डबलचे काम करतो.

सलमान खानचा 'राधे : योर मोस्ट वाँटेड भाई' हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटातील बरीच दृश्ये सलमान ऐवजी त्याचा बॉडी डबल परवेज काझीसोबत चित्रीत करण्यात आली आहे. चित्रपटाशी संबंधित काही खास क्षण परवेजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. ते आता व्हारयल होत आहेत. परवेजने आपल्या सोशल मीडिया अकाउंटच्या बायोमध्ये स्वतःचे वर्णन करताना 'अभिनेता मॉडेल आणि सलमान खानचा बॉडी डबल', असे लिहिले आहे.

या चित्रपटांमध्येही परवेजने केले आहे काम
परवेजने अलीकडेच प्रदर्शित झालेल्या राधे या चित्रपटाव्यतिरिक्त सलमान खान स्टारर भारत, दबंग 3, प्रेम रतन धन पायो, एक था टायगर, टायगर जिंदा है आणि रेस 3 मध्ये सलमानचा बॉडी डबल म्हणून काम केले आहे.

सलमानने आधी दिला इशारा आणि नंतर दाखल केला एफआयआर
सलमान खानचा राधे हा चित्रपट रिलीज होताच त्याचे पायरेटेज व्हर्जन अनेक साइट्सवर अपलोड करण्यात आले. या पायरेसीमुळे सलमानच्या मॅनेजरने सोमवारी पायरेसी करणाऱ्याच्या विरोधात मुंबईच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये एक लेखी तक्रार दिली आहे.

खरं तर, एक दिवस आधीच सलमानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन ‘राधे’ची पायरेसी करणाऱ्यांना चेतावनी दिली होती. त्यामुळे आता सायबर सेल त्या ऑनलाइन साइट्सच्या सोर्सला ट्रॅक करणार आहे, ज्या माध्यमातून अनेक लोकांनी चित्रपटाचे पायरेटेड व्हर्जन अपलोड आणि डाऊनलोड केले. एका अधिकाऱ्याने सांगितले, 'सायबर सेल व्हाट्सअॅप आणि टेलीग्रामसह इतर मॅसेजिंग प्लेटफॉर्मवर प्रसारित होणारा चित्रपट ‘राधे’च्या पायरेटेड व्हर्जनशी संबंधित तक्रारीचा तपास करत आहेत.'

बातम्या आणखी आहेत...