आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंगची तयारी:ऑगस्टपासून 'राधे'चे शूटिंग सुरू करू शकतो सलमान खान, मेहबूब स्टुडिओमध्ये होणार गाणी आणि उर्वरित भागांचे चित्रीकरण  

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑगस्टमध्ये शूटिंग सुरू करणारा सलमान पहिला ए लिस्टर स्टार आहे.

लॉकडाऊननंतर आता हळूहळू चित्रपटसृष्टीतील कामकाज हळूहळू सुरु होत आहे. अनेक चित्रपटांच्या पोस्ट प्रॉडक्शनला सुरुवात झाली आहे. आता अभिनेता सलमान खानसुद्धा लवकरच शूटिंगवर परतणार असल्याची बातमी आहे. 'राधेः योअर मोस्ट वाँटेड भाई' या चित्रपटाचे चित्रीकरण कोविड - 19 मुळे अर्ध्यावर थांबवावे लागले होते. पण आता सलमान आणि त्याची टीम या चित्रपटाचे उर्वरित चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे समजत.

मिड डेच्या रिपोर्टनुसार सलमान खान लवकरच स्टुडिओ बुक करण्यासाठी परवानगी घेणार आहे. जर सर्व काही ठीक झाले तर राधेचे शूटिंग ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा सुरू होईल. चित्रपटातील एका गाणे आणि काही भागांचे चित्रीकरण राहिले होते. कमीत कमी क्रू मेंबर्ससमवेत शूटिंग कसे करता येईल याची तयारी निर्मात्यांनी केली आहे. मेहबूब स्टुडिओ शूटिंगसाठी बुक केले जाईल.

  • ऑगस्टमध्ये शूटिंग पूर्ण होईल

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रभु देवा, निर्माते अतुल अग्निहोत्री आणि सलमान खान यांनी लवकरच शूटिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रीकरणासाठी मुंबईतील मेहबूब स्टुडिओ ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून बुक करण्यात येणार असून, काही उर्वरित भाग आणि गाण्याचे शुट येथे होईल. सलमान खान ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्याचा सलमानचा विचार आहे.

सलमान खान, दिशा पटानी, रणदीप हूडा आणि जॅकी श्रॉफ स्टारर फिल्म ‘राधेः योअर मोस्ट वाँटेड भाई’चे चित्रीकरण मार्च महिन्यात मुंबईत सुरु होते. मात्र लॉकडाऊनमुळे ते बंद पडले. अनलॉक झाल्यानंतर काही मोठे स्टार्स चित्रीकरणासाठी तयार नसल्याच्या बातम्या होत्या. पण सलमान खान चित्रीकरणासाठी तयार आहे. ऑगस्टमध्ये शूटिंग सुरू करणारा सलमान पहिला ए लिस्टर स्टार आहे.

बातम्या आणखी आहेत...