आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

स्वच्छ भारत:सलमान खानच्या पनवेलच्या फार्महाऊसमध्ये पडझड, गर्लफ्रेंड लुलियासोबत मिळून सलमानने केली साफसफाई

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वादळामुळे अभिनेता सलमान खानच्या पनवेलस्थित फार्महाऊसमधील अनेक झाडांची पडझड झाली आहे.

3 जून रोजी दुपारी अलिबागजवळ निसर्ग चक्रीवादळ धडकले होते. या चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक झाडे उन्मळून पडली. अनेक घरांची पत्रे, छप्पर वादळाने उडून गेले. तसेच ठिकठिकाणी पाणी साचले. या वादळामुळे अभिनेता सलमान खानच्या पनवेलस्थित फार्महाऊसमधील अनेक झाडांची पडझड झाली आहे.

दुस-या दिवशी सलमानने त्याच्या मित्रमैत्रीण आणि कुटुंबातील सदस्यांसोबत मिळूत फार्महाऊसची साफसफाई केली. त्याचा व्हिडीओ सलमानच्या इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. सलमानने व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये 'स्वच्छ भारत' असे लिहिले आहे. व्हिडीओत सलमानसोबत त्याची तथाकथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूरदेखील साफसफाई करताना दिसत आहे.

यापूर्वी लुलियाने वादळानंतरचे फार्महाऊसमधील काही फोटो शेअर केले होते. त्यात फार्महाऊसच्या परिसरातील झाडांची पडझड झाल्याचे दिसून आले. 

सलमानसोबत त्याच्या फार्महाऊसमध्ये लुलिया वंतूर, जॅकलिन फर्नांडिस, सलमानचा पुतण्या असे बरेच जण राहात आहेत. हे सर्वजण लॉकडाऊन जाहिर झाल्यावर तिथेच अडकले आहेत. 

फार्महाऊसमध्ये सलमानने शूट केले आहे गाणे

लुलिया आणि जॅकलिन सोशल मीडियावर फार्महाऊसचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. सलमानसुद्धा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात आहे. त्याने लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या निवांत वेळेत जॅकलिनसोबत मिळून तेरे बिना हे गाणे येथेच चित्रीत केले. हे गाणे स्वतः त्याने गायले आणि दिग्दर्शितदेखईल केले. फार्महाऊसवर केवळ चार दिवसांत तीन लोकांच्या मदतीने हे गाणे चित्रीत केले गेले. 

0