आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

एक हात मदतीचा:सलमान खानने मुंबई पोलिसांना दिले 1 लाख सॅनिटायझर्स, उद्धव ठाकरेंनी सोशल मीडियावर व्यक्त केले आभार

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस विभागाच्या फ्रंटलाइन वॉरियर्सना 'FRSH' सॅनिटायझर्स वितरित केले गेले आहेत.
Advertisement
Advertisement

मुंबईच्या फ्रंट लाईन वॉरियर्सच्या मदतीसाठी अभिनेता सलमान खान पुढे आला आहे. त्याने मुंबई पोलिसांना सॅनिटायझर्स दिले आहेत. ट्विटर हँडलवरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलमानचे आभार मानले आहेत. त्यांनी लिहिले, 'मुंबई पोलिसांना 1 लाख हँड सॅनिटायझर दान केल्याबद्दल धन्यवाद'.

युवा सेनेचे सदस्य राहुल कानल यांनी 'फ्रंटलाइन वॉरियर्सला मदत केल्याबद्दल सलमान खान तुमचे धन्यवाद', असे लिहून सलमानचे कौतुक केले. पोलिस विभागाच्या फ्रंटलाइन वॉरियर्सना 'FRSH' सॅनिटायझर्स वितरित केले गेले आहेत.

सलमानने काही दिवसांपूर्वी आपला खासगी केअर ब्रँड 'FRSH' बाजारात आणला आहे. काळाची गरज पाहून सलमान खानने सुरुवातीला सॅनिटायझर्स आणण्याचा निर्णय घेतला. माजी टेनिसपटू महेश भूपतीच्या ब्युटी ब्रॅण्ड असलेल्या स्केनशियल्ससोबतच्या जॉइंट वेेंचरच्या रुपात सलमानने आपला ब्रॅण्ड आणला आहे. रिपोर्ट्सनुसार तो जवळपास एक वर्षापासून या ब्रँडवर काम करत होता.

Advertisement
0