आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या 'टायगर 3'च्या सेटवरून लीक झाली व्हिडिओ क्लीप:इमरान हाश्मीची दिसली झलक, चाहते एक्साइटेड

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडेच सनी देओल यांच्या आगामी 'गदर 2' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता सलमान खान, कतरिना कैफ यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'टायगर 3' या चित्रपटाच्या शूटिंग सेटवरून एक व्हिडिओ लीक झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. व्हिडिओ समोर आल्यापासून चाहते चित्रपटासाठी आणखी उत्सुक झाले आहेत.

व्हिडिओमध्ये दिसली इमरान हाश्मीची झलक

‘एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांच्या यशानंतर सलमान खानने ‘टायगर 3’ची काही महिन्यांपूर्वी घोषणा केली होती. या चित्रपटात अभिनेता इमरान हाश्मी नकारात्मक भूमिकेत दिसणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच समोर आले होते. आता व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये इमरान हाश्मीची झलक दिसली आहे.

हा व्हिडिओ एका खोलीतील असल्याचे दिसत आहे. या खोलीत आजूबाजूला धूर दिसत आहे आणि त्यात इमरान हाश्मी दिसतोय. हा एक अ‍ॅक्शन सीन असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. व्हिडिओत इमरान काळा टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसतोय.

सलमान खानचा लूक झाला होता व्हायरल
'टायगर 3'मध्ये सलमान खानचा देखील वेगळा लूक पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर भाईजानचा लूक आधीच समोर आला आहे. या लूकमध्ये सलमानला क्षणभर ओळखताच येत नाही. लांब दाढी, लांब केस, पांढरा टी-शर्ट आणि निळ्या जीन्समध्ये तो देखणा दिसतोय.

सलमानचा हा चित्रपट 'टायगर' फ्रेंचाइजीमधील त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट आहे. आधीच्या भागातील सलमान आणि कतरिनाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती. या फ्रेचाइजीचा 'एक था टायगर' या पहिला भाग 2012 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर 'टायगर जिंदा है' हा दुसरा भाग 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील दोन्ही भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. आता चाहत्यांना सलमानच्या या तिसर्‍या भागाकडूनही मोठ्या आशा आहेत.

बातम्या आणखी आहेत...