आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमी अलीचा सलमान खानवर पुन्हा हल्लाबोल:मारहाण आणि शिवीगाळ करायचा, मेकअपने मारहाणीच्या खुणा लपवायची

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमी अलीने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यात तिने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत राहात असताना सलमान माराहाण करायचा आणि शिवीगाळही करायचा, असा आरोप सोमीने केला आहे. सोमीने असेही सांगितले की, जेव्हा सलमानला तिच्या अफेअरबद्दल कळले तेव्हा त्याने तिला खूप मारले होते आणि फक्त पुरुष फसवू शकतात, महिला नाही असेही सांगितले.

सोमीने सांगितल्यानुसार, अनेकदा तिने मारहाणीच्या खुणा मेकअपने लपवल्या. सोमी म्हणाली, 'सलमानने तिच्यासोबत जे काही केले ते काही वेगळे नाही, कारण त्याने अनेक मुलींसोबत असे केले आहे.' सलमानवर हल्लाबोल करण्याची सोमीची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तिने अनेकदा सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत.

मेक-अप करून जखम लपवत होते
सोमी अलीने तिच्या सोशल मीडियावर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने लिहिले, सलमानने तिच्या NGO ने प्रेरित असलेल्या डिस्कवरीवरील 'फाईट अँड फ्लाइट' या डॉक्युमेंट्रीवर बंदी घातली होती. 'मी न्यूयॉर्कमध्ये असताना सलमानच्या वकिलाने मला धमकीचे ईमेल पाठवले आणि सांगितले की जर ती सलमानच्या विरोधात काही बोलली तर माझा जीव जाईल.'

सोमीने पुढे सांगितले, "अजय शेलार माझा मेकअप आर्टिस्ट होता. तो माझ्या गळ्यावरील आणि शरीरावरील मारहाणीच्या खुणा मेकअपने लपवत असे. माझी परिस्थिती स्टु़डिओत निर्माते बघत होते. त्याने सार्वजनिकरित्य माझी माफी मागावी, अशी माझी इच्छा आहे. पण तो असे करणार नाही कारण तो इगो असलेली व्यक्ती आहे," असे सोमी म्हणाली.

लहानपणापासून हिंसा
सोमी पुढे म्हणाली, 'मला लहानपणापासून घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. मी पाच वर्षांची असताना माझ्यावर अत्याचार झाला होता. वयाच्या नववव्या वर्षी पाकिस्तानात माझे शारीरिक शोषण झाले. अमेरिकेत वयाच्या 14 व्या वर्षी लैंगिक हिंसाचार झाला. मी भारतात आले तेव्हा त्या व्यक्तीने माझ्यावर अत्याचार केला ज्याला मी 8 वर्षे डेट केले होते.'

सिगारेटचे चटके द्यायचा सलमान
सोमीने महिनाभरापूर्वी तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सलमान खानवर निशाणा साधला होता. स्वतःचा आणि सलमानचा जुना फोटो शेअर करत सोमीने लिहिले होते की, 'आता आणखी काही गोष्टी समोर येतील. भारतात माझा शो बॅन केला, माझ्यावर खटला दाखल करण्याची धमकी दिली. तू भित्रा आहेस, तुझ्या वकिलाला काढून टाक. माझ्या संरक्षणासाठी माझ्याकडे 50 वकील आहेत, तू अनेक वर्षे माझे शारीरिक शोषण केले, मला सिगारेटचे चटके दिले.'

सोमीने तिच्या पोस्टमध्ये काही शिव्यांचाही उल्लेख केला होता. त्याशिवाय अशा काही अभिनेत्रींवर निशाणा साधला, ज्यांनी सलमानला सपोर्ट केला आहे. ज्या व्यक्तीने महिलेला मारहाण केली, त्याच व्यक्तीला सपोर्ट करणाऱ्या महिलांचा धिक्कारही तिने या पोस्टमध्ये केला. आता लढण्याची वेळ आली असल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले होते.

'मैने प्यार किया' पाहून ती सलमानच्या प्रेमात पडली
सोमी अली पाकिस्तानमध्ये राहत होती, पण सलमानची चाहती असल्याने ती मुंबईत आली होती. इथे आल्यानंतर तिने सलमानसोबत एक चित्रपटही केला. त्यानंतर ते दोघे एकमेकांना डेट करू लगाले. 1991 मध्ये सोमी अली आणि सलमानचे अफेअर सुरू होतं. 1998 पर्यंत त्यांचे नाते टिकलं, त्यानंतर मात्र 8 वर्षांनी त्यांचे ब्रेकअप झाले. सलमानसोबत रिलेशनशिपमध्ये असताना सोमीने अंत, माफिया आणि आंदोलन या चित्रपटांमध्ये काम केले. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी अली परत फ्लोरिडाला गेली आणि तिने तिची एनजीओ सुरू केली. आता सातत्याने ती सलमानवर आरोप करतेय.

  • सोमी अलीचा सलमान खानवर पुन्हा एकदा निशाणा:केला शारीरिक शोषणाचा आरोप, म्हणाली- तो मला सिगारेटचे चटके द्यायचा

बॉलिवूड अभिनेत्री सोमी अलीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सलमान खानचे नाव न घेता त्याच्यावर हल्लाबोल केला आहे. आपल्या पोस्टमध्ये सोमी अलीने सलमान खानसोबतचा एक जुना फोटो शेअर करत त्याच्यावर शारीरिक शोषणाचा आरोप केला आहे. पण सोमीने आपली ही पोस्ट लगेच डिलीटदेखील केली आहे. आपल्या या पोस्टमध्ये सोमीने सलमान खान व्यतिरिक्त त्याला पाठिंबा देणा-या अभिनेत्रींवरही निशाणा साधला आहे. सोमीने सलमानवर तिचा केवळ शो बंद केला नाही, तर तिच्यावर केस करण्याची धमकीही दिल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तर तिने सलमाचे नाव न घेता त्याच्यावर सिगारेटचे चटके दिल्याचा आणि शिवीगाळ केल्याचा आरोपही केला आहे. सोमी अली एकेकाळी सलमान खानची गर्लफ्रेंड होती. अलीकडच्या काळात ती अनेकदा सलमान खानवर निशाणा साधताना दिसतेय. वाचा सविस्तर...

  • सोमी अलीने पुन्हा एकदा साधला सलमान खानवर निशाणा:लावले मारहाणीचे आरोप, म्हणाली - त्याची पूजा करणे थांबवा

सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अलीने पुन्हा एकदा त्याच्यावर निशाणा साधला आहे. सलमानच्या 'मैने प्यार किया' या चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करत सोमीने सलमानवरचा आपला राग व्यक्त केला आहे. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...