आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उद्या येणार 'राधे'चे नवीन गाणे:सलमान-दिशाच्या 'सिटी मार'नंतर आता जॅकलिन फर्नांडिस करणार धमाका, गाण्यात रणदीप हुडाच्या रुपात एक सरप्राइसिंग ट्विस्ट

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्या चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज होणार आहे.

सुपरस्टार सलमान खानच्या ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’मधील 'सिटी मार' या गाण्याला चाहत्यांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या गाण्यानंतर आता निर्माते आणखी एक डान्स नंबर 'दिल दे दिया है' सादर करण्यास सज्ज झाले आहेत. या गाण्याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला असून गाण्याची एक झलक सादर केली आहे. या गाण्यात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा स्पेशल अपिअरन्स आहे.

गाण्याच्या टीजरमध्ये जॅकलीनला एथनिक ड्रेसमध्ये दाखवण्यात आले असून तो ती अत्यंत सुंदरपणे कॅरी करताना दिसते आहे. गाण्यात आपण सलमान आणि जॅकलीनला लाइव्ह बीट्सवर थिरकताना पाहू शकतो. गाण्यामध्ये रणदीप हुडाच्या रुपात एक सरप्राइसिंग ट्विस्ट आहे मात्र, त्यासाठी तुम्हाला हे गाणे पहावे लागेल.

त्याचप्रमाणे, जॅकलीनने ज्या डांस स्टेप केल्या आहेत, त्या समजायला खूपच ट्रिकी आहेत, मात्र त्या तिने अत्यंत सहजतेने आणि शानदारपणे निभावल्या आहेत. हिमेश रेशमियाने या गाण्याला संगीत दिले असून शब्बीर अहमद याचे गीतकार आहेत. हे गाणे कमाल खान आणि पायल देव यांनी गायले असून शबीना खानने कोरिओग्राफ केले आहे.

सलमान खानसोबत या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वाँटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेडद्वारे निर्मित हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर 13 मेला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 'पे-पर-व्यू' सर्विसवर झी प्लेक्सवर देखील पाहता येईल.

बातम्या आणखी आहेत...