आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संताप:सलमान खान फिल्म्सच्या नावावर लोकांना मिळत आहेत कास्टिंगच्या खोट्या ऑफर्स, संतप्त सुपरस्टार म्हणाला- कायदेशीर कारवाई करेल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमानने ट्विटर हँडलवर एका पोस्टच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सुपरस्टार सलमान खानने ट्विटरवर एक मेसेज पोस्ट केला आहे, त्यानुसार कुणी तरी त्याचे प्रॉडक्शन हाऊस एसकेएफ (सलमान खान फिल्म्स) बद्दल अफवा पसरवत असल्याचे दिसून येत आहे. सलमानने आपल्या संदेशासह कॅप्शनमध्ये लिहिले की, “अफवांवर विश्वास ठेवू नका ... सुरक्षित राहा.”

संतप्त सलमानने दिली कायदेशीर कारवाई करण्याची धमकी

सलमानने आपल्या पोस्टमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. "मी हे स्पष्ट करु इच्छितो की, सध्या मी किंवा सलमान खान फिल्म्स दोघेही चित्रपटाचे कास्टिंग करत नाहीये. आम्ही आमच्या आगामी चित्रपटांसाठी कोणतेही कास्टिंग एजंट घेतलेले नाही. कृपया आपल्याला याविषयी प्राप्त झालेल्या मेसेर आणि ईमेल्सवर विश्वास ठेवू नका. जर एखाद्याने एसकेएफ किंवा माझे नाव चुकीच्या मार्गाने वापरलेले आढळले तर त्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल", असे सलमान खानने नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे.

सलमान पनवेलस्थित फार्महाऊसमध्ये अडकला आहे

लॉकडाऊनमुळे सलमान खान जवळपास दोन महिन्यांपासून त्याच्या पनवेलस्थित फार्महाऊसमध्ये अडकला आहे. गरजू लोकांना मदत करणे. गरिबांना रेशन पुरविणे, दैनंदिन मजुरांना पैसे ट्रान्सफर करणे, अशी सर्वतोपरी मदत तो करतोय.

  वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, 'दबंग 3' हा त्याचा अलीकडच्या काळात रिलीज झालेला शेवटचा चित्रपट आहे. सलमान सध्या आपल्या यूट्यूब वाहिनीसाठी सिंगल्स बनवित आहे. त्यांचे 'प्यार कोरोना' आणि 'तेरे बिन' ही दोन गाणी रिलीज झाली आहेत. 'तेरे बिन' हे गाणे सलमान आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यावर चित्रीत झालेले आहे.  वृत्तानुसार, आता तो तिसरे गाणे  रिलीज करण्याच्या विचारात आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत वलुश्चा डिसूझा झळकू शकते. 

बातम्या आणखी आहेत...