आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपकमिंग प्रोजेक्ट:32 वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच बायोपिकमध्ये दिसू शकतो सलमान, अभिनेत्याला आवडली ‘रेड’ फेम दिग्दर्शक राजकुमार गुप्तांची स्क्रिप्ट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाच वर्षांपासून रवींद्रच्या कथेवर काम करत आहेत राजकुमार

सलमान खान बॉलिवूडच्या त्या कलाकारांपैकी आहे, ज्याने विनोदी, अॅक्शन आणि रोमान्स या सर्वच धाटणीचे चित्रपट केले आहेत. आता मात्र तो आपल्या 32 वर्षांच्या सिने करिअरमध्ये पहिल्यांदाच एका बायोपिकमध्ये काम करणार आहे. हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'रेड’ फेम दिग्दर्शक राजकुमार गुप्ता बनवणार आहेत. हा चित्रपट 'ब्लॅक टायगर’ नावाने भारतीय गुप्तहेर रवींद्र कौशिक यांच्या जीवनावर आधारित आहे. रवींद्र यांना अाजही देशात सर्वात उत्कृष्ट गुप्तहेरांपैकी एक मानले जाते.

पाच वर्षांपासून रवींद्रच्या कथेवर काम करत आहेत राजकुमार
रवींद्र यांची कथा भारतीय गुप्तचर इतिहासाची सर्वात शौर्य आणि धक्कादायक कहाणीपैकी एक आहे. राजकुमार यावर 5 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी रवींद्रच्या जीवनावर संशोधन केले आणि पटकथा तयार करुन सलमानला ऐकवली. कथा ऐकल्यानंतर सलमानने चित्रपटासाठी होकार दिला आहे. या दोघांमधील चर्चा अंतिम स्तरावर सुरू आहे. मात्र, सलमानने यावर सही केली की नाही याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

70 ते 80 च्या दशकात सेट होणार कथा, अॅक्शनचा भरपूर डोस
चित्रपटाच्या एका सूत्रानुसार, सलमान पहिल्यांदाच एखाद्या बायोपिकमध्ये दिसणार आहेत. या ड्रामा थ्रीलर चित्रपटात अ‍ॅक्शनचा भारी डोसही असणार आहे. ही कथा 70 ते 80 च्या काळात सेट केली जाणार आहे. यासाठी राजकुमार गुप्ता यांची टीम तो काळ पुन्हा उभारण्यावर काम करत आहे. निर्मातेही चित्रपटाच्या शीर्षकासाठी “ब्लॅक टायगर” पेक्षा चांगल्या नावाचा विचार करत आहेत.

कोण होते रवींद्र कौशिक?
रवींद्र कौशिक भारतीय संशोधन आणि विश्लेषण शाखेत एजंट होते. ते पाकिस्तानी सैन्यात मेजर रँकवर कार्यरत होते. रॉ एजंट होण्याआधी ते एक प्रसिद्ध थिएटर कलाकार होते. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी आपली योग्यता दाखवली होती. त्यांनी लखनऊमध्ये नाटकात काम केले होते. तेथे भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाहिले आणि त्याच वेळी त्याच्याशी संपर्क साधला. पाकिस्तानमध्ये इंटेलिजन्स एजंट होण्यासाठी अधिकाऱ्यांनी त्यांना नोकरीची ऑफर दिली. वयाच्या 23 व्या वर्षी त्यांना पाकिस्तानच्या मिशनवर पाठवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...