आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमान खानचा मदतीचा हात:राखी सावंतच्या कॅन्सरग्रस्त आईच्या मदतीसाठी पुढे आला सलमान खान, राखीने शेअर केला व्हिडिओ

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राखी सावंतच्या मदतीसाठी सलमान खान धावून आल्याचं समजतंय.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त रिअॅलिटी शो म्हणून ओळखल्या जाणा-या ‘बिग बॉस’च्या 14 व्या पर्वाचा ग्रॅण्ड फिनाले नुकताच पार पडला. या शोमध्ये अभिनेत्री राखी सावंत सहभागी झाली होती. तिने चॅलेंजर म्हणून शोमध्ये एन्ट्री घेतली आणि टॉप 5 स्पर्धकांमध्ये मजल मारली. मात्र शेवटच्या क्षणी राखीने 14 लाख रुपये घेऊन फिनालेमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान तिने तिची आई हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असल्याचे सांगून हे पैसे आईच्या उपचारांसाठी वापरणार असल्याचे ती म्हणाली. फिनालेमध्ये सलमान खानने देखील तिच्या निर्णयाचे स्वागत केले. आता राखीने सोशल मीडियावर आईचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात राखी आणि तिची आई जया सलमान आणि सोहेल यांचे आभार व्यक्त करताना दिसत आहेत.

या व्हिडिओनुसार, राखी सावंतच्या मदतीसाठी सलमान खान धावून आल्याचं समजतंय. राखीच्या आईच्या उपचारांसाठी सलमान आणि सोहेल खान मिळून मदत करत आहेत. या मदतीबद्दल समजताच राखीच्या आईने दोघांचेही आभार मानले आहेत. 'माझी किमोथेरपी सुरु आहे. चार किमो झाले असून आणखी दोन बाकी आहेत. सलमान आणि सोहेल तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवाोत आणि तुम्ही सुखी-समाधानी राहा,' असे राखीची आई जया व्हिडिओत म्हणत आहेत.

राखीची आई संध्या मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये असून तिथे त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरु आहेत. राखीने यापूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर आईचे दोन फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने, ‘माझ्या आईसाठी प्रार्थना करा. ती कॅन्सरवर उपचार घेत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. हा फोटो पाहून चाहत्यांनी तिला स्वतःची आणि आईची काळजी घेण्यास सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...