आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पठाण'मधील सलमानचा कॅमिओ लीक:शाहरुख म्हणाला - पायरसीशी लढण्यासाठी तुम्हीही आमच्या इंडस्ट्रीतील एक सैनिक व्हा!

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर अवतरला आहे. त्याच पठाण हा चित्रपट आज जगभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची शाहरुखचे चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होते. आता या चित्रपटातून प्रेक्षकांना डबल ट्रीट मिळाली आहे. कारण या चित्रपटात शाहरुखसोबत सलमान खानने स्क्रीन शेअर केली आहे. या चित्रपटात त्याचा कॅमिओ आहे. पण प्रदर्शनाच्या एक दिवसआधीच 'पठाण' चित्रपटात ऑनलाइन लीक झाला आहे.

सलमानचा कॅमिओ लीक
वृत्तानुसार, ‘पठाण’ चित्रपट Filmyzilla आणि Filmy4wap या वेबसाईटवर लीक करण्यात आला आहे. निर्मात्यांनी चित्रपट लीक होऊ नये, म्हणून खबरदारी घेतली होती. पण तरीही चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. चित्रपटातील सलमाचा कॅमिओ सीन सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या सीनमध्ये पठाण आणि टायगर शत्रूंशी दोन हात करताना दिसत आहेत.

शाहरुखने केली विनंती
'पठाण' चित्रपटाची पायरसी करु नका, अशी विनंती शाहरुखने केली आहे. 'से नो टू पायरसी,' असे शाहरुख म्हणाला आहे. 'जसा #पठाण भारतासाठी लढत आहे, तसेच पायरसीशी लढण्यासाठी तुम्हीही आमच्या चित्रपट इंडस्ट्रीतील एक सैनिक होऊ शकता! 25 जानेवारीपासून #Pathaan जगभरात फक्त थिएटरमध्ये पहा आणि पायरसीला नाही म्हणा! पॉवर तुमच्या हातात आहे,' अशी पोस्ट शाहरुखने केली आहे.

यशराजनेही केले आवाहन
‘पठाण’ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या यशराज फिल्म्सनेदेखील प्रेक्षकांना चित्रपट ऑनलाइन व्हायरल करु नका, असे आवाहन केले आहे. याबाबत एक ट्वीट करत ते म्हणाले, "तुम्ही सगळ्यात मोठ्या धमाकेदार अक्शन चित्रपटासाठी तयार आहात? कृपया चित्रपट पाहताना व्हिडीओ शूट करुन ते ऑनलाईन व्हायरल करू नका. ‘पठाण’चा आनंद चित्रपटगृहांतच जाऊन घ्या," असे ट्वीटमध्ये म्हटले गेले आहे.

चित्रपट 77 हजार स्क्रीन्सवर झाला रिलीज
सिनेविश्लेषक तरण आदर्श यांनी केलेल्या ट्वीटनुसार, शाहरुखचा चित्रपट देशभरात 5 हजार 200 स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे, जो हिंदी, तमिळ आणि तेलगू या तीन भाषांमध्ये आहे. तर परदेशात 2 हजार 500 स्क्रीनवर पठाण दाखवण्यात येणार आहे. एकूणच जगभरात हा चित्रपट 77 हजार स्क्रीनवर प्रदर्शित होत आहे.

संबंधित वृत्त

  • 77 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला 'पठाण':'KGF 2' आणि 'वॉर'चा रेकॉर्ड मोडणार, पहिल्या दिवशी होऊ शकते एवढी कमाई

तब्बल 4 वर्षांच्या विश्रांतीनंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख मोठ्या पडद्यावर आज दमदार कमबॅक करतोय. त्याची प्रमुख भूमिका असलेला 'पठाण' हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शाहरुख खानसह दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंगही दमदार झाली आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'पठाण'मध्ये शाहरुखचा न पाहिलेला अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते याची आतुरतेने वाट पाहत आहेत. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...