आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे सलमान आणि जॅकलिनमध्ये दुरावा:नव्या वादात अडकू इच्छित नाही सलमान, जॅकलिनसोबत तोडली मैत्री

13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होत आहे. गेल्या 6 दिवसांत दिल्ली पोलिसांच्या EOW ने तिची दोनदा चौकशी केली. अलीकडील वृत्तानुसार, जॅकलिनचा मित्र आणि सुपरस्टार सलमान खानने जॅकलिनचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नाव आल्यापासून तिच्यापासून अंतर ठेवायला सुरुवात केली आहे.

कायदेशीर अडचणीत अडकू इच्छित नाही सलमान

सलमान आणि जॅकलिन या दोन जवळच्या मित्रांमध्ये फूट पडल्याचे वृत्त आहे.​​​​​​ बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, सलमान खान कठीण प्रसंगी नेहमी त्याच्या मित्रांच्या पाठीशी उभा असतो, मात्र जॅकलिनच्या बाबतीत त्याने स्वतःला दूर ठेवले आहे. खरं तर सलमान खान आणि जॅकलिन यांच्यात चांगली मैत्री होती, पण आता सलमानला कोणत्याही नव्या वादात अडकायचे नाही. त्याची काही प्रकरणे न्यायालयात आधीच प्रलंबित आहेत. त्यामुळेच त्याने त्याची मैत्रीण जॅकलिनपासून अंतर वाढवले ​​आहे. रिपोर्ट्सनुसार, समलानने जॅकलिनला सुकेशपासून दूर राहण्याचा सल्लाही दिला होता. पण तिने त्याचे म्हणणे ऐकले नाही.

जॅकलिन 'किक' या चित्रपटात सलमान खानसोबत झळकली होती. रिपोर्ट्सनुसार, सलमाननेच जॅकलिनला तिच्या करिअरमध्ये मदत केली होती.
जॅकलिन 'किक' या चित्रपटात सलमान खानसोबत झळकली होती. रिपोर्ट्सनुसार, सलमाननेच जॅकलिनला तिच्या करिअरमध्ये मदत केली होती.

सुकेशकडून मिळालेल्या भेटवस्तू आणि नातेसंबंधावर प्रश्न
सोमवारी जॅकलिनची EOW ने सुमारे 7 तास चौकशी केली. यामध्ये तिचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे नाते?, तिला सुकेशकडून महागड्या भेटवस्तू का मिळाल्या?, ती सुकेशला किती वेळा भेटली आणि ती त्याला किती दिवसांपासून ओळखत होती? असे अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आले. याआधी 14 सप्टेंबर रोजी तिची सुमारे 8 तास चौकशी झाली होती.

सुकेशने जॅकलिनला पार्शियन जातीच्या दोन मांजरी भेट दिल्या होत्या.
सुकेशने जॅकलिनला पार्शियन जातीच्या दोन मांजरी भेट दिल्या होत्या.

सुकेशने जॅकलिनला महागड्या भेटवस्तू दिल्या
जॅकलिनला या प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरसोबत लग्न करायचे होते. सुकेशने जॅकलिनला एस्पुएला नावाचा 50 लाखांचा घोडा आणि 9-9 लाख रुपयांच्या मांजरी भेट दिल्या होत्या. शिवाय 3 डिझायनर बॅग, 2 Gucci जिम वेअर, लुई विटॉनची एक शू जोडी, डायमंड कानातले, एक रुबी ब्रेसलेट, दोन हर्मीस ब्रेसलेट आणि एक मिनी कूपर कार सुकेशने जॅकलिनला भेट दिली होती.

सुकेश आणि जॅकलिनचे खासगी फोटो व्हायरल झाले होते. हे फोटो ईडीने पुरावे मानले आहेत.
सुकेश आणि जॅकलिनचे खासगी फोटो व्हायरल झाले होते. हे फोटो ईडीने पुरावे मानले आहेत.

तिहार तुरुंगातून सुकेशने केली होती 200 कोटींची फसवणूक
सुकेश चंद्रशेखरशी संबंधित प्रकरणात प्रथम दिल्ली पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात आला होता. दिल्ली ईओडब्ल्यूने ऑगस्टमध्ये त्या एफआयआरची चौकशी सुरू केली. या प्रकरणी ईडीने मनी लाँड्रिंगचीही चौकशी सुरू केली होती. रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर सिंग आणि मालविंदर सिंग यांना तुरुंगातून बाहेर काढण्याच्या बहाण्याने त्यांच्या पत्नींकडून 200 कोटींहून अधिकची फसवणूक केल्याचा आरोप सुकेशवर आहे.

सुकेश स्वत:ची ओळख कधी पंतप्रधान कार्यालयाशी तर कधी गृहमंत्रालयाशी निगडित अधिकारी म्हणून करायचा. या फसवणुकीत तिहार तुरुंगातील अनेक अधिकारीही सहभागी होते. सुकेश या सर्वांना मोठी रक्कम द्यायचा, असे म्हटले जाते. ईडीने सुकेशचा चेन्नईतील सी-फेसिंग बंगला जप्त केला होता. बंगल्यातून 82.5 लाख रुपये, 2 किलो सोने आणि 12 पेक्षा जास्त आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...