आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालॉकडाऊनमुळे सलमान खान सध्या पनवेलमधील फॉर्म हाऊसमध्ये अडकला आहे. परंतु यामुळे त्याच्या कामावर काहीही परिणाम झाला नाही. तो तेथे नवीन स्क्रिप्ट सतत वाचत असतो. सूत्रानुसार त्याला एक कथा खूप आवडली आहे. त्याच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्याची त्याची तयारी आहे. या चित्रपटात सलमान खान स्वत: असणार आहे. त्याच्याबरोबर पुलकित सम्राट, कृती खरबंदा, सुनील ग्रोव्हर आणि डेझी शाहदेखील यात झळकणार आहेत. ‘बुलबुल मॅरेज हॉल’ असे या चित्रपटाचे नाव आहे.
चित्रपटात सलमान जोडप्यांना भेटवणाऱ्यांची भूमिका करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उत्तर प्रदेशमध्ये होणार असून यामध्ये दोन वेगवेगळ्या जोडप्यांच्या कथा दाखविण्यात येणार आहेत. कथा ‘ड्रीम गर्ल’ फेम दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी लिहिली आहे. तर रोहित नय्यर दिग्दर्शन करणार आहेत.
या चित्रपटात सुनील ग्रोव्हर पुलकित सम्राटच्या मोठ्या भावाची भूमिका साकारणार आहे. सुनीलने यापूर्वी सलमान खानसोबत 'भारत' या चित्रपटात काम केले होते. चित्रपटात कृती खरंबदा आणि पुलकित सम्राट ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे.विशेष म्हणजे खासगी आयुष्यात हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.