आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनचा परिणाम:कुटुंबापासून दूर आहेत सलमान आणि जया, लॉकडाऊन 2.0 घोषित झाल्यानंतर घरी परतण्याची आशा तुटली 

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • जया बच्चन, सलमान खान, अर्जुन रामपाल, मनोज बाजपेयी, मौनी रॉय आणि संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त आपल्या कुटुंबापासून दूर आहेत.

14 एप्रिल रोजी देशातील 21 दिवसांचे लॉकडाऊन पूर्ण झाले. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन 2.0 ची घोषणा केली, जे 15 एप्रिल ते 3 मे दरम्यान चालणार आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनमुळे आपल्या कुटुंबियांपासून दूर इतर देशांमध्ये आणि शहरांमध्ये अडकलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींची घरी परतण्याची आशा पुन्हा एकदा तुटली आहे. यामध्ये जया बच्चन, सलमान खान, अर्जुन रामपाल, मनोज बाजपेयी, मौनी रॉय आणि संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त यांच्या नावांचा समावेश आहे.

 • जया बच्चन दिल्लीत अडकल्या आहेत

अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन अभिनेत्रीसोबतच एक राज्यसभा खासदार आहेत. जेव्हा पहिल्यांदा लॉकडाउन जाहीर केले गेले तेव्हा त्या संसदेच्या कामकाजात भाग घेण्यासाठी दिल्लीत हजर होत्या. त्यांच्या 72 व्या वाढदिवशी अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले होते की, "लॉकडाऊनमुळे जया मुंबईला परत येऊ शकली नाही. ती दिल्लीत तिच्या घरी आहे आणि सुरक्षित आहे. आणि हो नक्कीच तिचा दिवस फेसटाइमशिवाय जात नाही. असे वाटते की, आम्ही सर्व एकत्र आहोत."

 • सलमान खान पनवेलमध्ये अडकला

सुपरस्टार सलमान खान पनवेलमधील त्याच्या फार्महाऊसमध्ये अडकला आहे. त्याच्यासोबत त्याची धाकटी बहीण अर्पिता, मेहुणे आयुष शर्मा आणि भाचा आहिल, पुतण्या निर्वाण आहेत. सलमान कुटुंबासोबत फार्महाऊसमध्ये असताना लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि त्यामुळे हे सर्वजण मुंबईत परतू शकले नाहीत. एक व्हिडिओ शेअर करून स्वत: सलमानने सांगितले की, तो तिथे अडकला आहे आणि त्याला आपल्या कुटुंबाची आठवण येत आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानचे वडील सलीम खान यांनी दैनिक भास्करशी झालेल्या संभाषणात म्हटले होते की, "माझ्या आयुष्यात प्रथमच असे घडले आहे की माझा मुलगा इतक्या दिवसांपासून माझ्यापासून दूर आहे. ही जबाबदारीने वागण्याची वेळ आहे. याकाळात दूर राहणे चांगले आहे."

 • संजय दत्त त्याच्या घरात एकटा
 • संजय दत्त त्याच्या घरात एकटा

संजय दत्त त्याच्या घरात (वांद्रे इम्पीरियल) एकटाच आहे आणि 'रामायण' आणि 'महाभारत'सारखे कार्यक्रम बघून वेळ घालवतोय. त्याने नॉन-व्हेजआणि ड्रिंकदेखील सोडले आहे. संजय दत्तचा मित्र आणि 'सरबजीत' (२०१)) सारख्या चित्रपटाचा निर्माते संदीप सिंगने  दैनिक भास्करशी बोलताना सांगितले की, बाबा (संजय)ची पत्नी मान्यता आणि मुले दुबईत अडकले आहेत. ते तिथे सुट्टीसाठी गेले होते. परंतु लॉकडाऊनमुळे परत येऊ शकले नाही.

 • अर्जुन रामपाल कर्जतमध्ये अडकला आहे
 • अर्जुन रामपाल कर्जतमध्ये अडकला आहे

अभिनेता अर्जुन रामपाल हा मैत्रीण गॅब्रिएला डेमेट्रिड्स आणि 7 महिन्यांचा मुलासोबत मुंबईपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या कर्जतमध्ये अडकून पडला आहे. तो तिथे त्याच्या आगामी 'भीमा कोरेगाव' चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. 19 ते 31 मार्च दरम्यान जेव्हा चित्रीकरणावर बंदी घालण्यात आली तेव्हा अर्जुनने हा वेळ कर्जतमध्ये घालवण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून उर्वरीत शूटिंग बंदी उठताच पूर्ण करता येईल. पण 24 मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आणि अर्जुन तिथे अडकून पडले. अर्जुनचा मित्र राहुल मित्राने त्याच्याविषयीची माहिती दैनिक भास्करबरोबर शेअर केली होती.

 • मौनी रॉय दुबईत अडकली

टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय एका अ‍ॅड शूटच्या संदर्भात दुबईला गेली होती. पण त्यादरम्यान, देशात घोषित लॉकडाऊनमुळे ती तिथेच अडकली. ती रोजंदारीवर काम करणा-या मजुरांची चिंता करीत आहेत आणि मदत पाठवत आहेत. निर्माता संदीप सिंगच्या म्हणण्यानुसार, मौनीने त्याला तिच्यावतीने रोजंदारीवर काम करणार्‍या लोकांना रेशन देण्यास सांगितले आहे. दुबईहून परत येताच मौनी संदीप सिंग यांचे पैसे परत करणार आहे. 

View this post on Instagram

🤷🏻‍♀️🙆🏻‍♀️

A post shared by mon (@imouniroy) on Apr 15, 2020 at 5:40am PDT

 • देहरादूनमध्ये अडकले मनोज बाजपेयी 
 • देहरादूनमध्ये अडकले मनोज बाजपेयी

निर्माता संदीप सिंगने सांगितल्यानुसार, त्याचा मित्र आणि अभिनेता मनोज बाजपेयी देहरादूनमध्ये अडकले आहेत. ते तिथे शूटसाठी गेले होते. परंतु लॉकडाऊनमुळे परत येऊ शकले नाही.

 • गोव्यात अडकल्या नफिसा अली 
 • गोव्यात अडकल्या नफिसा अली

अभिनेत्री नफिसा अली आपल्या मुलीसह सुट्टी साजरी करण्यासाठी गोव्यात गेल्या होत्या. परंतु, त्याचकाळात लॉकडाऊनची घोषणा केली गेली आणि त्या तिथेच अडकल्या. कर्करोगातून ब-या झालेल्या नफिसा यांना येथे अडचणींचा सामना करावा लागला. त्यांची औषधे संपली. नफिसा यांच्या आवाहनावर भारतीय सैन्याच्या मदतीने रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी औषधे दिल्लीहून त्यांच्यासाठी गोव्यात आणण्यात आली.

 • खंडाळ्यात अडकले जॅकी श्रॉफ

जॅकी श्रॉफ खंडाळ्यातील आपल्या फार्महाऊसमध्ये अडकले आहेत. नुकत्याच झालेल्या संभाषणात जॅकी यांची पत्नी आयशा यांनी सांगितले की ते तिथे मान्सूनपूर्व काम पुर्ण करायला आणि काही झाडे लावण्यास गेले होते. परंतु लॉकडाऊनमुळे परत येऊ शकले नाही. तथापि, त्यांच्याबरोबर त्यांचे कर्मचारीही आहेत. आयशा यांच्या म्हणण्यानुसार जॅकी फोन कॉल व व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून कुटुंबाशी संपर्कात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये ते म्हणत होते, "लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे. आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी घरी रहा. मी आशा करतो की आपण सर्व घरी असाल."

View this post on Instagram

#BreakTheChain #StayHomeStaySafe

A post shared by Jackie Shroff (@apnabhidu) on Apr 15, 2020 at 3:11am PDT

बातम्या आणखी आहेत...