आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाईजानला दिलासा:पत्रकार मारहाण प्रकरणी सलमान खानची निर्दोष सुटका, न्यायमूर्ती म्हणाल्या - खटला पुढे चालू ठेवणे हा अन्याय होईल

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार वर्षे जुन्या पत्रकार मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सलमान खान आणि त्याच्या अंगरक्षकाला मोठा दिलासा दिला आहे. 2019 मध्ये अभिनेत्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा न्यायालयाने फेटाळला आहे आणि त्याला सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे. आरोपी केवळ सेलिब्रिटी आहे म्हणून न्यायालयीन प्रक्रिया छळाचे कारण बनू नये, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

2019 मध्ये पत्रकार अशोक पांडे यांनी सलमान खान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेख यांच्यावर धमकावणे आणि मारहाण केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने पत्रकाराशी गैरवर्तन केल्याच्या सलमानला समन्स बजावले होते.

उच्च न्यायालयाने सलमानवरील आरोप फेटाळून लावले
ETimes च्या वृत्तानुसार, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती डांगरे यांनी 30 मार्च रोजी सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज यांनी दाखल केलेला अर्ज स्वीकारला आणि कनिष्ठ न्यायालयाने जारी केलेली कार्यवाही आणि समन्स रद्द केले.

कारवाई सुरू ठेवणे याचिकाकर्त्यावर अन्याय ठरेल - न्यायमूर्ती भारती डांगरे
न्यायमूर्ती डांगरे सुनावणीदरम्यान म्हणाल्या की, अर्जदारांविरुद्ध (सलमान खान आणि नवाज) कारवाई सुरू ठेवणे कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर होईल.

चार वर्षे जुने आहे प्रकरण
24 एप्रिल 2019 रोजी पत्रकार अशोक पांडे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, ते त्यांच्या कॅमेरामनसोबत जुहूहून कांदिवलीला कारने जात होते आणि वाटेत सलमान खान सायकल चालवताना दिसला. यादरम्यान त्यांनी सलमानचा व्हिडिओ बनवण्यासाठी त्याच्या दोन अंगरक्षकांची परवानगी मागितली आणि त्यांना परवानगी मिळाली.

पत्रकार अशोक पांडे
पत्रकार अशोक पांडे

याचिकेत त्यांनी पुढे म्हटले होते की, जेव्हा सलमान खानने व्हिडिओ बनवताना पाहिले तेव्हा अभिनेत्याला ते आवडले नाही आणि त्याने विरोध केला. अभिनेत्याच्या अंगरक्षकाने मारहाण केल्याचे पांडे यांनी म्हटले आहे. सलमान खाननेही त्यांना मारहाण केली आणि नंतर त्यांचा फोन हिसकावून घेतला. या घटनेनंतर पोलिसांनी सलमानविरुद्ध केलेल्या तक्रारीवर कारवाई न केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर अशोक पांडे न्यायालयात गेले. अंधेरी कोर्टात त्यांनी खटला दाखल केला. त्यानंतर आयपीसीच्या कलम 504 आणि 506 अंतर्गत सलमानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

2022 मध्ये सलमान हायकोर्टात गेला
22 मार्च 2022 रोजी अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टाने सलमान खानला समन्स पाठवले होते. त्याला हजर राहण्यासाठी 5 एप्रिल 2022 ही तारीख देण्यात आली होती. मात्र, हजर न होता या समन्सविरोधात सलमानने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता या प्रकरणात सलमानची निर्दोष मुक्तता झाली आहे.