आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिली प्रतिक्रिया:जुही चावलाने नाकारले होते सलमानचे स्थळ, म्हणाली - 'तेव्हा सलमान मोठा स्टार नव्हता, आजही तो मला टोमणे मारतो'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक काळ असा होता जेव्हा अभिनेता सलमान खान जुही चावलासोबत लग्न करू इच्छित होता. एका जुन्या मुलाखतीत स्वतः सलमानने ही गोष्ट उघड केली होती. आता पहिल्यांदाच जुहीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. जुहीने सांगितल्यानुसार, जेव्हा तिने करिअरला सुरुवात केली होती, तेव्हा सलमान मोठा स्टार नव्हता.

जुहीच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या काळात ती सलमानला फारशी ओळखत नव्हती. सलमानसोबत एक चित्रपट मी करणार होते, पण नंतर तो चित्रपट बनलाच नाही, असेही जुहीने सांगितले आहे.

सलमान, आमिर यांच्याबद्दल मला फारशी माहिती नव्हती - जुही
काही दिवसांपूर्वी सलमाची एक जुनी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. या मुलाखतीत त्याने जुहीसोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली होती. सलमानने जुहीच्या वडिलांकडे लग्नाचा प्रस्तावदेखील ठेवला होता. मात्र वडिलांनी जुहीसाठी सलमानचे स्थळ नाकारले होते.

नुकत्यात न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत जुहीने सांगितले की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला सलमान आणि आमिर खानबद्दल फारशी माहिती नव्हती. ती म्हणाली, "जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली होती तेव्हा सलमान आजसारखा मोठा अभिनेता नव्हता, तेव्हा त्याची मुख्य भूमिका असलेल्या एक चित्रपट मला ऑफर करण्यात आला होता. खरं तर, तेव्हा मी कोणालाच नीट ओळखत नव्हतो. आमिर खान किंवा इंडस्ट्रीतील इतर कोणालाही नाही. योगायोगाने, काही अडचणींमुळे मी तो चित्रपट करू शकले नव्हते." यावेळी लग्नाच्या मागणीबद्दल विचारले असता ते आपण हसून टाळले होते, असे जुही म्हणाली.

'सलमान आजही टोमणे मारतो'
जुही आणि सलमान एकत्र चित्रपटात काम करू शकले नाही, त्यामुळे बऱ्याचदा तो जुहीला टोमणे लगावत असतो. त्याबद्दल बोलताना जुही पुढे म्हणाली, "सलमान मला त्याची आठवण करून देण्याची एकही संधी सोडत नाही. आम्ही एकत्र चित्रपटात काम केले नाही पण आम्ही बरेच स्टेज शो केले. ‘दीवाना मस्ताना’मध्ये त्याचा (सलमान) कॅमिओ होता."

जुहीच्या वडिलांनी नाकारले होते सलमानचे स्थळ
सलमानच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत तो म्हणतो, 'जुही खूप सुंदर आहे, मी तिच्या वडिलांकडे जुहीसोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता.' मुलाखत घेणाऱ्या होस्टने सलमानला जुहीच्या वडिलांनी काय उत्तर दिले, असा प्रश्न विचारला. त्यावर सलमानने जुहीच्या वडिलांनी नाही असे उत्तर दिले होते, असे सांगितले.

जुहीने विवाहित पुरुषाशी केले लग्न, सलमान अजूनही बॅचलर
सलमान खानशी संबंधित ही व्हिडिओ क्लिप 1990 च्या काळातील आहे. या मुलाखतीला वर्षे उलटून गेली आहेत, पण सलमान अजूनही जोडीदाराच्या शोधात आहे. तर जुहीने 1995 मध्येच लग्न केले. तिची लव्हस्टोरीही खूप रंजक आहे. तिचे पती जय मेहता आधीच विवाहित होते. जुही पहिल्यांदा जय यांना भेटली तेव्हा त्यांची पहिली पत्नी सुजाता बिर्ला यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता.

या अपघातानंतर जुही आणि जय यांच्यात जवळीक वाढली आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. जुही आणि जय यांच्या वयात सात वर्षांचे अंतर आहे. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत. जुहीचे पती जय मेहता हे मेहता ग्रुप या बहुराष्ट्रीय कंपनीचे मालक आहेत. त्याच्या दोन सिमेंट कंपन्याही आहेत. जुही शाहरुख खानसोबत आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्सची को-ओनरदेखील आहे.

सलमानने अनेक अभिनेत्रींना केलंय डेट
सलमान खानने आपल्या आयुष्यात अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे, परंतु त्यापैकी कोणाशीही त्याचे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्याच्या आणि ऐश्वर्या रायच्या नात्याची सर्वाधिक चर्चा झाली.

सलमान आणि ऐश्वर्या 1997 मध्ये 'हम दिल दे चुके सनम'च्या सेटवर जवळ आले होते. मात्र, नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. याशिवाय सलमानचे नाते संगीता बिजलानी, सोमी अली आणि कतरिना कैफसोबतही होते. आता सलमान रोमानियन मॉडेल युलिया वंतूरसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.