आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टायगर 3:सलमान खान, कतरिना कैफ आणि चित्रपटाच्या टीमने तुर्कीमध्ये कोविड प्रोटोकॉलसह केले चित्रीकरण, 17 दिवसांत पूर्ण केले 20 दिवसांचे शेड्यूल

अमित कर्ण3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शूटिंगच्या वेळी इम्रान हाश्मी चित्रपटात काम करत नसल्याचे सांगितले गेले होते

कोविड काळात परदेशात शूटिंग करणे आता कलाकारांसाठी एक वेगळा अनुभव ठरत आहे. कोविडच्या आधी युरोपियन देशात चित्रीकरणासह प्रवासाचा अनुभव संस्मरणीय ठरत असे, पण आता कलाकारांना तिथे मोठ्या शिस्तीने राहावे लागते. याचे ताजे उदाहरण आहे सलमान खान आणि कतरिना कैफचा चित्रपट 'टायगर 3'. चित्रपटातील कलाकार आणि क्रू यांनी अलीकडेच तुर्कीमध्ये चित्रीकरण पूर्ण केले. चित्रपटाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, तुर्की सरकारचे बायो बबलचे पालन करण्यासाठी खूप कठोर नियम आणि कायदे आहेत. येथील प्रशासनाने कोणत्याही स्टार किंवा क्रू मेंबरला शहरात फिरू दिले नाही. प्रत्येकाला हॉटेलमधून थेट सेट किंवा इतर लाइव्ह लोकेशन्सवरच जाण्याची परवानगी होती.

शूटिंगच्या वेळी इम्रान हाश्मी चित्रपटात काम करत नसल्याचे सांगितले गेले होते

चित्रपटाशी संबंधित एका सूत्राने सांगितले, "दिग्दर्शक मनीष शर्मा, अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांनी येथे अॅक्शन सिक्वेन्सचे चित्रीकरण केले. चित्रपटाला व्हिज्युअली आकर्षक आणि अॅक्शन थ्रिलिंग बनवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या अॅक्शन डायरेक्टर्सना चित्रपटासोबत जोडण्यात आले. सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी अनय गोस्वामी यांना देण्यात आली. 'टायगर जिंदा है' मधील टायगरचे मिशन आखाती देशांमध्ये होते. यावेळी टायगरचा प्रवास पूर्व युरोपियन देशांमध्ये होतो. चित्रपटात सलमान आणि कतरिना मुख्य भूमिकेत आहेत. इम्रानच्या नावाविषयी आतापर्यंत तुर्कीच्या सेटवर सस्पेन्स ठेवण्यात आला होता. इम्रान हाश्मी चित्रपटात नसल्याचे तेथे सांगण्यात आले. मात्र मीडिया रिपोर्ट्सनुसार, इम्रान या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत आहे. पण सेटवर त्याच्या नावावर सस्पेन्स का ठेवण्यात आला, याचे कारण प्रॉडक्शन हाऊसने सांगितले नाही."

शूटिंगची परवानगी न मिळाल्याने 20 दिवसांचे शॉट 17 दिवसांत चित्रीत करण्यात आले

अॅक्शन सीन्स मुळात तुर्कीमध्ये शूट करण्यात आले होते. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये चित्रपटातील गाणी चित्रीत झाली. सूत्रांनी सांगितले, "तुर्कीच्या वेळापत्रकानुसार प्रॉडक्शन हाऊसची 20 दिवसांची तयारी होती, परंतु प्रशासनाकडून केवळ 17 ते 18 दिवसांसाठी परवानगी देण्यात आली होती. अशा मर्यादित वेळेत सलमान खान सकाळी लवकर उठून रात्री उशिरापर्यंत शूटिंग करत होता. त्याने 17 दिवसांत 20 दिवसांचे शॉट्स पूर्ण केले. यामध्ये, सलमान सोबत कतरिनाचे फाइट आणि गन चेन सिक्वेन्सचा समावेश आहे. यावेळी रॉच्या टीममध्ये चंद्रचूड रॉय, कुमुद मिश्रा आणि अनंत विधात यांनाही कास्ट केले गेले. चंद्रचूड रॉय हे 'दम लगा के हइशा'नंतर यशराज चित्रपटात दिसणार आहेत. तर अनंत विधात या चित्रपटाच्या मागील भागातही होते."

बातम्या आणखी आहेत...