आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेलेब बिझनेस:बीइंग ह्यूमननंतर सलमानने लाँच केला पर्सनल केअर ब्रॅण्ड FRSH, कोरोनाच्या काळात सर्वप्रथम विकणार सॅनिटायझर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमान वर्षभरापासून या ब्रॅण्डवर काम करत होता.

क्लॉदिंग, फिटनेस इक्विपमेंट, जिम आणि सायकल ब्रॅण्डनंतर सलमान खान आता चक्क सॅनिटायझर विकताना दिसत आहे. त्याने ‘फ्रेश’ (FRSH) नावाची एक कंपनी सुरु केली आहे. या कंपनीचे बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण, सौदर्य प्रसाधने अशा प्रकारचे अनेक प्रॉडक्ट्स लवकरच बाजारात येणार आहेत. परंतु सध्या करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे सलमान केवळ सॅनिटायझरची विक्री करत आहे. ईदच्या निमित्ताने 54 वर्षीय सलमानने याची घोषणा ट्विटरवर केली आहे.

या कंपनी बाबत अधिक माहिती देण्यासाठी सलमानने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. 'नवीन ग्रुमिंग आणि पर्सनल केअर ब्रॅण्ड फ्रेश लाँच करतोय. हा आहे तुमचा, माझा आणि आपल्या सगळ्यांचा ब्रॅण्ड. सॅनिटायझर्स आले आहेत', अशी माहिती त्याने दिली आहे. सलमानने सोबतच फ्रेशची अधिकृत वेबसाइट लिंकसुद्धा शेअर केली आहे. 

सलमानच्या फ्रेश कंपनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलमानने फ्रेशची सुरुवात माजी टेनिस प्लेअर महेश भूपतीच्या स्केनशियल्स या ब्युटी ब्रॅण्डसोबत जॉइंट वेंचरच्या रुपात केली आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान वर्षभरापासून या ब्रॅण्डवर काम करत होता. 

बातम्या आणखी आहेत...