आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सलमान खान आणि करीना कपूर खान स्टारर 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट भारतीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये गणला जातो. 2015 मध्ये रिलीज झालेल्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 320 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला होता. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला दाद मिळाली होती. आता या चित्रपटाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत आणि चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे लवकरच 'बजरंगी भाईजान'चा सिक्वेल येऊ शकतो.
'भाईजान 2'ची कल्पना सलमानला आवडली
याचा खुलासा 'बाहुबली' या गाजलेल्या चित्रपटाचे लेखक के.व्ही विजयेंद्र यांनी एका मुलाखतीत केला आहे. विजयेंद्र प्रसाद म्हणाले, 'मी बजरंगी भाईजान 2 क्रॅक करण्याचा प्रयत्न करीत आहे. काही दिवसांपूर्वीच मी सलमानला चित्रपटाची कल्पना सांगितली आणि त्याबद्दल तोही उत्साहित आहे. लवकरच यावर काम सुरु होईल अशी आशा आहे.'
विजयेंद्र यांनी पुढे सांगितले, काही दिवसांपूर्वी सलमानसोबत माझी अचानक भेट झाली होती. त्यावेळी मी त्याला बजरंगी भाईजानच्या सिक्वेलबद्दल सांगितले. ही एक चांगली कल्पना आहे, असे सलमान त्यांना म्हणाला होता.
सलमान सध्या 'टायगर 3'च्या शूटिंगमध्ये बिझी
सलमान खान सध्या कतरिना कैफसोबत 'टायगर 3' या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. हा चित्रपट बँड बाजा बारात, लेडीज व्हर्सेस रिकी बहल, शुद्ध देसी रोमान्स आणि फॅन या चित्रपटांचे दिग्दर्शक मनीष शर्मा दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात मुख्य खलनायक म्हणून इमरान हाश्मीची निवड करण्यात आली आहे आणि निर्मात्यांनी त्याच्या भूमिकेविषयी सस्पेन्स कायम ठेवला आहे. चित्रपटाचे शूटिंग एकापेक्षा अधिक ठिकाणी होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती YRF बॅनरअंतर्गत होतेय.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.