आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाऊनमध्ये छोटीशी भेट:60 दिवसानंतर आईवडिलांना भेटला सलमान, मदतकार्याचा आढावा घेतला आणि पनवेलला परतला

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिसांच्या परवानगीने मुंबईत पोहोचला होता सलमान खान.

लॉकडाऊनमुळे मागील 60 दिवसांपासून पनवेलमधील आपल्या फार्महाऊसमध्ये अडकलेला सलमान खान मंगळवारी मुंबईत पोहोचला. मुंबईला येत असताना सलमानने आवश्यत ती सर्व काळजी घेतली. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला असलेल्या आपल्या आईवडिलांची त्याने भेट घेतली आणि त्यानंतर तो पनवेलला परतला.

  • मुंबईत येण्यामागचे हे होते एक कारण

आईवडिलांची भेट घेण्यासोबतच सलमानचे अचानक मुंबईत येण्यामागे आणखी एक कारण सांगितले जाते. वृत्तानुसार, कोरोनाव्हायरस साथीच्या काळात मुंबईत त्याच्या वडिलांच्या मदतकार्यात काही अडथळा तर येत नाहीये ना, याचा आढावा घेण्यासाठीही तो आला होता.

  • पोलिसांच्या परवानगीने मुंबईत पोहोचला

मुंबई मिररच्या वृत्तानुसार, सलमानने पालकांना भेटण्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली होती. त्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले आणि काही तास आईवडिलांसोबत घालवून तो रात्री पनवेलला परत गेला.

  • पनवेलमध्ये आहेत सलमानचे काही फॅमिली मेंबर्स

सलमानसह त्याची बहीण अर्पिता, मेहुणे आयुष शर्मा, पुतण्या निर्वाण, मैत्रिणी जॅकलिन फर्नांडिज, वलुष्चा डिसोझा आणि युलिया वंतूर हे देखील पनवेलमध्ये अडकले आहेत. सलमानने एका बातचीतमध्ये सांगितले होते की, तो दिवसांसाठी पनवेलमध्ये गेला होता, पण त्याच काळात लॉकडाऊनची घोषणा झाली आणि तो मुंबईत परतू शकला नाही.

  • 3000 पेक्षा जास्त गरजुंना मदत पोहोचवतोय सलमान

सलमान खान आणि त्याची टीम फिल्म इंडस्ट्रीतील अशा 3000 हून अधिक गरजुंना मदत करीत आहे, ज्यांच्या आयुष्यावर लॉकडाऊनमुळे परिणाम झाला आहे. त्याने पनवेलच्या आसपासच्या गावातील 1000 स्थानिक कुटुंबांना रेशन दिले आहे. 

बातम्या आणखी आहेत...