आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड अभिनेता सलमान खान 14 वर्षांनंतर शनिवारी कोलकाता येथे पोहोचला. येथे त्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची त्यांच्या कालीघाट येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सलमानचे शाल देऊन स्वागत केले.
यानंतर दोघांनीही निवासस्थानाबाहेर उपस्थित लोकांचे अभिवादन स्वीकारले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानने मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. सलमान आज ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबच्या मैदानावर 'दबंग द टूर रीलोडेड' या कार्यक्रमात सहभागी होणार आहे, हा त्याचा लाइव्ह शो होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता शो सुरू होईल.
धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे
तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी ट्वीट केले की, सलमान खान 13 मे रोजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घरी भेट देणार आहे. त्यांची भेट घेतल्यानंतर सलमान ईस्ट बंगाल मैदानावर मेगा शो करणार आहेत. तब्बल 14 वर्षांनंतर अभिनेता कोलकात्यात येत आहे. त्याला नुकत्याच मिळालेल्या धमक्या पाहता कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांनीही स्वतंत्रपणे विशेष बंदोबस्त ठेवला आहे.
अलीकडील धमक्यांमुळे लांबणीवर पडला होता हा कार्यक्रम
अलीकडच्या काळात सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. त्यामुळे त्याचा कोलकाता दौरा लांबला. त्याचा हा दबंग टूर आधीच ठरलेला होता, पण धमक्यांमुळे तो लांबणीवर टाकण्यात आला. या कार्यक्रमासाठी त्याला ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबच्या अधिकाऱ्यांनी आमंत्रित केले आहे.
या शोमध्ये बॉलिवूडचे अनेक स्टार्स सहभागी होणार आहेत
सलमानने दबंग कॉन्सर्टचे आयोजन परदेशात देखील केले आहे. सलमान आता कोलकाता येथे दबंग टूर करतोय. 13 मे 2023 रोजी कोलकाता येथील ईस्ट बंगाल क्लबमध्ये सलमानच्या दबंग टूर कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, सलमानच्या दबंग टूरच्या तिकिटांची किंमत 699 रुपयांपासून 40,000 रुपयांपर्यंत आहे. इतकेच नाही तर तुम्हाला लाउंजमध्ये प्रवेश हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला 2 लाख ते 3 लाख रुपये मोजावे लागतील.
सलमान खानच्या दबंग टूर कॉन्सर्टमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात. प्रभू देवा, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिस, गायक गुरु रंधावा, आयुष शर्मा आणि मनीष पॉल यांसारखे सेलिब्रिटी कोलकातामध्ये सलमानसोबत स्टेजवर परफॉर्म करताना दिसणार आहेत.
एअरपोर्टवर भाईजान:कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बुलेट प्रूफ कारमधून विमानतळावर पोहोचला सलमान खान, दबंग टूरसाठी कोलकात्याला रवाना
अभिनेता सलमान खान नुकताच मुंबईतील कलिना विमानतळावर दिसला. दबंग टूरसाठी तो मुंबईहून कोलकात्याला रवाना झाला आहे. सलमानचा विमानतळावरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेता काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि डेनिम जीन्समध्ये नेहमीप्रमाणे हॅण्डसम दिसतोय. यावेळी त्याच्यासोबत मनीष पॉलही दिसला. वाचा सविस्तर...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.