आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाईजानने सोडले मौन:लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर पहिल्यांदा व्यक्त झाला सलमान, म्हणाला - 'मी काहींचा भाई तर काहींचा जान'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला गेल्या काही महिन्यांपासून सतत जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. या धमकी प्रकरणावर सलमानने अखेर बुधवारी एका पत्रकार परिषदेत मौन सोडले आहे. सलमानने याबाबत थेट प्रतिक्रिया दिलेली नसली तरी त्याच्या उत्तराने चाहते इम्प्रेस झाले आहेत.

मी काहींचा भाई आणि काहींचा जान
बुधवारी सलमान एका पत्रकार परिषदेत सहभागी झाला होता. या पत्रकार परिषदेत त्याला मिळणाऱ्या धमकीबाबत प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही सगळ्या देशाचे भाई आहात. तुम्हाला मिळणाऱ्या धमक्यांकडे तुम्ही कसे बघता? त्यावर सलमान उत्तर देत म्हणाला, 'मी सगळ्यांचा भाई नाही. मी काही जणांचा भाई आहे तर काहींचा जान,' असे म्हणत सलमानने मिळणाऱ्या धमकीवर थेट उत्तर देणे टाळले.

लॉरेन्स बिश्नोईने दिली सलमानला जीवे मारण्याची धमकी
गेल्या काही दिवसांपासून सलमान गँगस्टर गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या निशाण्यावर आहे. महिन्याभरापूर्वी लॉरेन्सने तुरुंगातून एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, 'जर सलमानने बिश्नोई समाजाची माफी मागितली नाही तर त्याला परिणामांना सामोरे जावे लागेल.'

बालपणापासून सलमानचा तिरस्कार करतो लॉरेन्स बिश्नोई
मुलाखतीत लॉरेन्स पुढे म्हणाला होता की. "माझा सलमान खानवर लहानपासून राग आहे. कधी ना कधी सलमान खानचा अहंकार मोडणार आहे. त्याने आमच्या देवाच्या मंदिरात येऊन माफी मागितली पाहिजे. सलमान खानने बिश्नोई समाजातील लोकांना पैशांचे आमिष दाखवले होते. त्याला आम्ही प्रसिद्धीसाठी नाही तर बदला घेण्यासाठी मारणार आहोत," असे बिश्नोईने म्हटले.

धमकीचा आला होता सलमानला ईमेल
रोहित गर्ग नावाच्या एका तरुणाने सलमान खानच्या जवळच्या सहकाऱ्याला ई-मेल पाठवून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खानच्या टीमने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रोहित गर्गने ई-मेलमध्ये लिहिले आहे की, कुख्यात गुंड गोल्डी ब्रारला सलमान खानशी बोलायचे आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीचाही संदर्भ देण्यात आला आहे. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला मारणे हे त्याच्या आयुष्याचे ध्येय असल्याचे म्हटले होते. यानंतर सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.

काळवीट शिकारप्रकरणी सलमानला झाला होता तुरुंगवास
रिपोर्ट्सनुसार, 1998 मध्ये 'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने राजस्थानच्या जंगलात काळवीटाची शिकार केली होती. सलमानशिवाय सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम कोठारी यांनाही आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर बिश्नोई समाजाने सलमानविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सलमानला जोधपूर कोर्टाने पाच वर्षांची शिक्षाही सुनावली होती, मात्र नंतर त्याला या प्रकरणात जामीन मिळाला होता.