आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राधे : योर मोस्ट वाँटेड भाई':सद्यःस्थितीत लोकांचे मनोरंजन आणि त्यांचे मन वळवण्यासाठी चित्रपट प्रदर्शित केला - सलमान खान

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना मोटिव्हेट करायचे आहे.

या ईदला सलमान खानने आपले वचन पाळले. त्याचा सिनेमा राधे भारतात प्रदर्शित होऊ शकणार नाही, मात्र विदेशात पाहिला जाणार आहे. शिवाय देशात सलमानचे चाहते झी स्टुडिओच्या विविध माध्यमांवर हा चित्रपट पाहू शकतात. सिनेमा रिलीजच्या निमित्ताने सलमानने मीडियाशी संवाद साधला आणि चित्रपटाविषयी चर्चा केली...

  • लोकांचे मनोरंजन आणि त्यांचे मन वळवण्यासाठी चित्रपट प्रदर्शित केला

कोरोनाच्या या वाईट काळात लोक दुःखी आणि नैराश्यात आहेत. त्यांचे मन परिवर्तन व्हावे आणि मनोरंजन व्हावे म्हणून आम्ही हा चित्रपट आणला आहे. कोरोना लोकांच्या डोक्यातून निघून जावा, असे वाटते. मला ब-याच लोकांचे मेसेज आले की, सध्या लोक अडचणीत आहेत. हा कठीण काळ आहे आणि तुम्ही सिनेमा बनवत आहात. असे म्हणणारेही आपल्या जागी योग्य आहेत. मात्र इतरांचे काय जे आपल्या अडचणी दूर करु पाहात आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना मोटिव्हेट करायचे आहे. तेच आम्ही बिग बॉसमध्ये केले होते. नंतर सरकार जेव्हा चित्रपटगृह सुरु करेल, तेव्हा आम्ही याचे प्रदर्शन करु. मी चित्रपटगृह मालकांना याचे वचन देतो.

  • वाजिदची त्यांच्या आवाजातील बरीच गाणी माझ्याकडे आहेत

नुकतेच साजिदने आपला भाऊ गमावला. दुःखातून सावरत पुन्हा काम करण्यासाठी स्वतःला तयार करणे साजिदला खूप अवघडे गेले. माझ्याकडे वाजिदची बरीच गाणी आहेत. आता जेव्हा चित्रपट येईल तेव्हा लोकांना पुन्हा त्याचा आवाज ऐकू येईल. ब-याच गाण्यांमध्ये वाजिदचा आवाज आहे.

  • आप्तेष्टांसाठी लोकांचा बेड हिसकावला नाही

मला माझ्या ब-याच मित्रांकडून औषधे मिळवून द्या, इंजेक्शन मिळवून देण्यासाठी फोन येतात. आयसीयू बेडची, ऑक्सिजनची गरज आहे. मात्र मी त्यांना सहकार्य केले नाही. कारण आपल्या लोकांसाठी मी दुस-याचा बेड हिसकावू शकत नाही. हो, मात्र जेथे बेड उपलब्ध असतील, तेथे नक्कीच त्यांना मदत केली. याशिवाय ज्यांच्या घरात सुविधा नाही, त्यांच्यासाठी आम्ही काम करत आहोत. परंतु मी खूप नाराज आहे. लोकांनी हा रोग पैसे कमावण्याचे साधन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...