आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काळवीट शिकार प्रकरण:अभिनेता सलमान खानला 28 सप्टेंबर रोजी जोधपूर कोर्टात हजर राहण्याचा आदेश; आर्म्स अ‍ॅक्टमध्ये होणार सुनावणी

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलमानवर ऑक्टोबर 1998 मध्ये हम साथ साथ हैं या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान कांकणी गावाजवळ दोन काळवीटची शिकार केल्याचा आरोप होता.

काळवीट शिकार आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या प्रकरणात चित्रपट अभिनेता सलमान खानला जोधपूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 28 सप्टेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या खटल्याची आज सुनावणी झाली. आज सलमानच्या याचिकेवर काळवीट शिकार प्रकरणाची आणि राज्य सरकारच्या याचिकेवर शस्त्रास्त्र कायद्याची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही आणि पुढील सुनावणीच्या तारखेला सलमानला स्वत: कोर्टात हजर होण्याचे आदेश देण्यात आले. आता सलमानला 28 सप्टेंबरला जोधपूर कोर्टात हजर व्हावे लागेल.

  • काय आहे प्रकरण?

काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 चे आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाचे शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला. यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत. काळवीट शिकारप्रकरणी दोषी ठरलेल्या सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आले.

शिक्षेनंतर सलमानची रवानगी जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली होती. सध्या सलमान जामिनावर बाहेर आहे. सलमानने ट्रायल कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे. त्याचप्रमाणे, 1998 मध्ये परवाना कालावधी संपला असूनही सलमानवर शस्त्रे ठेवल्याचा आरोप होता. त्यानंतर सलमानला या प्रकरणात निर्दोष सोडण्यात आले. राज्य सरकारने कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान दिले आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser