आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसपीबींना श्रद्धांजली:एस.पी. बालासुब्रमण्यम यांच्या निधनाने दु:खी सलमान खान म्हणाला- माझे मन फार दुखावले आहे...

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एस. पी. बालासुब्रमण्यम यांनी वयाच्या 74 व्या वर्षीय अखेरचा श्वास घेतला.

बॉलिवूडमध्ये सलमान खानला आपल्या आवाजाने लोकप्रिय करणारे प्रसिद्ध पार्श्वगायक ए. पी. बालासुब्रमण्यम यांच्या निधनाची बातमी ऐकून सलमान खान दु:खी झाला. त्याने ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सलमान खानने ट्विट केले, ''एस.पी. बालासुब्रमण्यम सरांबाबत ऐकून मन फार दुखावले आहे. तुम्ही नेहमी संगीताच्या इतिहासात जिवंत राहात. कुटुंबीयांसोबत माझी सहानुभूती आहे. #RIP''

गुरुवारी रात्री बालासुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली होती. त्यावेळी देखील सलमानने त्यांची प्रकृती लवकरात लवकर उत्तम व्हावी यासाठी प्रार्थना केली होती. “बालासुब्रमण्यम सर तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल यासाठी मी प्रार्थना करतो. तुम्ही माझ्यासाठी गायलेल्या सर्वच गाण्यांसाठी तुमचे खुप आभार तुम्ही मला नक्कीच खास बनवले आहेत. तुमच्यासाठी खुप प्रेम,” असे ट्विट सलमानने केले होते.

  • सलमानच्या सुरुवातीच्या चित्रपटात दिला आवाज

सलमान खानच्या करिअरच्या सुरुवातीला बालासुब्रमण्यम यांनी त्याला आवाज दिला होता. ‘मैंने प्यार किया’ सारखे चित्रपटातील -‘आते जाते’, ‘कबूतर जा जा’, ‘आजा शाम होने आई’, ‘मेरे रंग में रंगने वाली’ आणि टायटल साँग (मैंने प्यार किया) मध्ये बालासुब्रमण्यम यांनी आपल्या आवाजाची जादू पसरवली. त्यावेळी सलमानसारख्या नवीन अभिनेत्याला बालासुब्रमण्यम यांनी आपला आवाज देणे मोठी गोष्ट होती. या चित्रपटातील ‘दिल दीवाना बिन सजना के माने ना’या गाण्यासाठी त्यांना बेस्ट प्लेबॅक गायकाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांना लता मंगेशकर यांच्यासोबत गायलेले गाणे ‘दीदी तेरा देवर दीवाना’साठी फिल्मफेअरचा विशेष पुरस्कारदेखील मिळाला होता.

बातम्या आणखी आहेत...