आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड सुपरस्टार सलमान खानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या एका अतिशय जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. अभिनेत्याने एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने या महिलेला श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, ती महिला नेमकी कोण आहे? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.
सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर रात्री उशिरा एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सलमानने एका महिलेचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, "माझी प्रिय अद्दू, मी मोठा होत असताना तू मला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. खूप प्रेम" सलमानची ही पोस्ट समोर आल्यानंतर अब्दू रोझिक, जान कुमार सानू, किली पॉल यांच्यासह अनेकांनी या महिलेला श्रद्धांजली वाहिली आहे.
ही महिला कोण होती?
सलमानने या पोस्टमध्ये ही महिला त्याची नेमकी कोण होती, याचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे चाहते संभ्रमात पडले आहे. ही ‘अद्दू’ नेमकी कोण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही यूजर्सनी ती सलमान खानची केअर टेकर असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, ही महिला सलमान खानची आया असल्याचे काहींचे म्हणणे आहे. मात्र याबाबत ठोस काहीही सांगता येत नाही.
सलमान खानचे चित्रपट
सलमान खान नुकताच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने सलमानसह पूजा हेगडे, जगपती बाबू, शहनाज गिल. राघव जुयाल, जस्सी गिल, पलक तिवारी, व्यंकटेश, भूमिका चावला या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. पण हा मल्टीस्टार चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी जादू दाखवू शकला नाही. या चित्रपटाने 100 कोटींचा बिझनेस केला आहे. पण सलमानच्या मागील चित्रपटांच्या तुलनेत तो कमाईत मागे पडला आहे. सलमानच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे तर तो लवकरच ‘टायगर 3’मध्ये कतरिना कैफसोबत दिसणार आहे. यासोबतच यशराज फिल्म्सने सलमान आणि शाहरुख स्टारर 'टायगर वर्सेस पठाण' या चित्रपटाची देखील घोषणा केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.