आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशराजचा आगामी सिनेमा:शाहरुख खानच्या 'पठाण'मध्ये हेलिकॉप्टरने एंट्री घेणार सलमान खान, खलनायकाला ठार मारण्यात करणार शाहरुखची मदत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटात सलमान खानचा अ‍ॅनिमेटेड कॅमिओदेखील दिसणार आहे.

शाहरुख खान तीन वर्षांनंतर ‘पठाण’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोन आहे. जॉन अब्राहम खलनायकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात सलमान खानचा अ‍ॅनिमेटेड कॅमिओदेखील दिसणार आहे.

आता या सिनेमात सलमानची एंट्री एका दृश्यादरम्यान हेलिकॉप्टरने केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर ते 20 मिनिटांच्या अ‍ॅक्शन सीनमध्ये खलनायकाला ठार मारण्यात शाहरुखची मदत करताना दिसणार आहे.

या सीनचे शूट दुबईच्या बुर्ज खलिफामध्ये केले जाणार असल्याची चर्चा आहे. लॉकडाउन उघडल्यानंतर या चित्रपटाचे उर्वरित 30 टक्के शूटिंग रशियामध्ये केले जाईल, असे निर्मात्यांनी सांगितले. लॉकडाउन नसते तर चित्रपटाचे चित्रीकरण जूनपर्यंत पूर्ण झाले असते. आता जुलैच्या अखेरपर्यंत चित्रीकरण पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

2021 च्या अखेरीस शाहरुख शूट करू शकतो अ‍ॅटलीचा सिनेमा

दुसरीकडे 'पठाण' च्या शूटिंगच्या या ब्रेकदरम्यान दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक अ‍ॅटली यांनी शाहरुखला त्याच्या पुढील चित्रपटाची कहाणी सांगितली असल्याचे बोलले जात आहे. गेल्या महिन्यात लॉकडाउनपूर्वी अ‍ॅटली मुंबईत आले होते. येथे त्यांनी शाहरुखची भेट घेऊन स्क्रिप्टचे फायनल नॅरेशन दिले होते. दोघांच्या भेटीबद्दलची अधिक माहिती समोर आलेली नाही. सर्वकाही जुळून आल्यास यावर्षाच्या अखेरपर्यंत शाहरुख चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करु शकतो. ऑक्टोबर 2019 मध्ये पहिल्यांदा या चित्रपटाबद्दल चर्चा सुरु झाली होती.

बातम्या आणखी आहेत...